पिंपरी-चिंचवड

यंत्रणा अपुरी, कचऱ्याची समस्या कायम

CD

पिंपरी गाव

पिंपरी : घरोघरच्या कचरा संकलनासाठी घंटागाड्या अपुऱ्या पडत आहेत. परिणामी, कचरा साचल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांची कसरत होत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत घंटागाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.
सध्या काही घंटागाड्यांद्वारे सकाळी नऊ वाजता कचरा संकलन करण्यात येते. तर, कधी सायंकाळी सहा वाजता गाडी येते. यात अनेकदा तीन गाड्या नादुरुस्त असतात. त्यामुळे आठ गाड्यांवर कचरा संकलनाचा ताण येतो. यामुळे ‘कचराकुंडी मुक्त प्रभाग’ संकल्पना राबवताना कचरा संकलनासाठी योजना अपुऱ्या असल्याचे नागरिक सांगतात. याचा आरोग्य कर्मचारी वर्गावरही ताण येत आहे. ओला, सुका, प्लॅस्टिक, घातक, वैद्यकीय अशा पाच प्रकारचा कचरा स्वीकारला जातो. पण नागरिकांकडून वर्गीकरण केले जात नाही. सुभाष घाट, पिंपरी मार्केट, अशोक थिएटर, गणेशनगर, महात्मा फुले महाविद्यालय परिसर, रेल्वे स्टेशन, फुल मार्केट, पिंपरी गाव म्हाडा इमारत आदी ठिकाणी रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग दिसतात. यामुळे साथीच्या आजारांचा धोका आहे.

परिसरातील स्थिती
- काही नागरिकांकडून कचरा उघड्यावरच टाकण्याचे प्रकार
- अपुऱ्या वाहनसंख्येमुळे कचरा व्यवस्थापनाचे आव्हान
- वाढत्या कचऱ्यामुळे आरोग्य कर्मचारी वर्गावरही ताण
- ‘कचराकुंडी मुक्त प्रभाग’ संकल्पना राबवण्यात मर्यादा

कचरा संकलनासाठी लागणाऱ्या गाड्यांची संख्या अपुरी आहे. एका गल्लीत एक गाडी भरते. यातच भाजी मंडईचा कचरा, हॉटेल व्यावसायिकांचा कचरा यांची भर पडते. लोकसंख्या पाहता येथे दुपटीने गाड्यांची आवश्यकता आहे.
- अरविंद वाणी, पिंपरी गाव नागरिक

परिसर स्वच्छतेसाठी यंत्रणा तोकडी पडत आहे. कचराकुंडीमुक्त प्रभाग संकल्पना चांगली आहे. तितकीच सक्षम यंत्रणा हवी.
- श्रीरंग सातव, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT