पिंपरी-चिंचवड

धर्मेंद्र यांच्या चित्रपटगीतांच्या मैफिलीत श्रोते मंत्रमुग्ध

CD

पिंपरी, ता. ३१ : ‘पल पल दिल के पास’, ‘तुम जो चले गये तो’, ‘चल मेरे भाई’,‘शीशा हो या दिल हो’, ‘इतना तो याद है मुझे’, ‘जानू मेरी जान’ या गीतांना रसिक प्रेक्षकांची मिळालेली दाद तसेच दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर चित्रित झालेल्या गीतांना मिळालेला ‘वन्स मोअर’ अशा वातावरणात ‘गाडी बुला रही है’ हा कार्यक्रम झाला.
विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत या कार्यक्रमात धर्मेंद्र यांच्यावरील हिंदी चित्रपटगीते सादर करण्यात आली. निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे झालेल्या या सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मैफलीस दिशा सोशल फाउंडेशनचे संस्थापक बाळासाहेब जवळकर, सचिन साठे, संतोष बाबर, साहित्यिक अशोक कोठारी, उज्ज्वला केळकर, विलास गादडे, ॲड. स्मिता शेटे, योगेश म्हस्के आदी उपस्थित होते. ललिता जगदाळे, अमृता कुलकर्णी, तुषार पिंगळे, विजय वाघमारे या अतिथी गायकांसह सतीश कापडी, अरुण सरमाने, राजेंद्र पगारे, सूर्यकांत ताम्हाणे, सीमा पोडाला, सचिन शेटे, नंदकुमार कांबळे, विनायक कदम या गायक कलाकारांनी हिंदी चित्रपटातील वैविध्यपूर्ण गीतांचे प्रभावी सादरीकरण केले.
‘हम बेवफा हरगिझ न थे’ या गीताच्या सादरीकरणापूर्वी प्रेक्षागृहातील सर्व उपस्थितांनी उभे राहून दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे संयोजन विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी केले. सचिन शेटे यांनी विशेष सहकार्य केले. निराली मांकड यांनी मैफलीचे निवेदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic jam : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी; खंडाळा बोगद्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Sugar Factory : कारखाने वर्षभर सुरू ठेवण्यासाठी हालचाली, मल्टिफीडसाठी ६३ कारखान्यांचा पुढाकार

T20 WC, IND vs NED: ...अन् मोठा अनर्थ थोडक्यात टळला! सूर्यकुमार - रिंकू सिंगची जोरात धडक अन् चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; Video

Chhatrapati Shivaji Maharaj:विदर्भभूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने ६ वेळा पावन, आग्रा कैदेतून सुटल्यानंतर विदर्भातून प्रवास

SCROLL FOR NEXT