पिंपरी-चिंचवड

नववर्षानिमित्त आयोजित चित्रपटगीतांच्या मैफलीला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

चित्रपटगीतांच्या मैफलीला
श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद


पिंपरी, ता. १० : ‘आने से उसके’, ‘ए सनम जिसने तुम्हे’, ‘मेरे मेहबूब कयामत होगी’, ‘प्यार माँगा हैं’, ‘दिल में हो तुम’ या गीतांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते नववर्षानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘बच के रहना रे बाबा’ या हिंदी-मराठी चित्रपटगीतांच्या मैफलीचे.
निगडी प्राधिकरणातील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात झालेल्या या मैफलीचे आयोजन विविध भारती म्युझिकल इव्हेंटच्या वतीने करण्यात आले होते. गायिका ललिता जगदाळे, शुभांगी पवार, स्वाती भागवत, नेहा दंडवते, सुचिता शेटे-शर्मा, स्मिता उरणकर, शर्मिला डंबे, अरुण सरमाने, डॉ. किशोर वराडे, सतीश गडचे, सुधाकर बाविस्कर, पिनाक भिंगारे, दिनेश कर्वे, अनिल जंगम, नंदकुमार कांबळे विनायक कदम या गायक कलाकारांनी हिंदी-मराठी चित्रपटातील वैविध्यपूर्ण गीतांचे प्रभावी सादरीकरण केले.
मैफलीत ‘प्यार करनेवाले’ , ‘दो कदम तुम भी’, ‘फुल तुम्हे भेजा हैं’, ‘दिल की ए आरजू थी’ , ‘कोरा कागज था’, ‘वादा करले साजना’, ‘दिवाना हुआ बादल’, ‘आजकल तेरे मेरे’, ‘जाने दो जाने दो’, ‘इतना न तू मुझसे’ अशा एकाहून एक श्रवणीय गीतांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. ‘बच के रहना रे बाबा’ या शीर्षकगीताने मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. संकल्पना नंदकुमार कांबळे यांची होती. विनायक कदम यांनी संयोजन केले. सचिन शेटे यांनी सहकार्य केले. सीमा गांधी यांनी निवेदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT