पिंपरी, ता.१२ : ‘‘भाजपला सत्तेची मस्ती एवढी आलेली आहे की, मत द्या अथवा देऊ नका. पण निवडून आलेल्या उमेदवारांनाही फोडायचे काम ते करतात. मात्र, दहा वर्षांत तुमची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. पिंपरी चिंचवडसाठी तुम्ही काय केलं ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी (ता. १२) उपस्थित केला.
भोईरनगर येथील जयवंत प्राथमिक शाळेच्या मैदानावर पार पडलेल्या सभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या सभेस पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक १७ मधील अधिकृत उमेदवार मनिषा आरसूळ, भाऊसाहेब भोईर, शोभा तानाजी वाल्हेकर आणि शेखर चिंचवडे उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘‘आमचे कुटुंब तुटलं नसतं तर; संपूर्ण महाराष्ट्र आमचा असला असता. पण, ती वेळ आली. या निवडणुकीला लोकशाही टिकविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. पिंपरी चिंचवड शहराचा विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला. येथील स्वच्छ रस्ते असतील, राजीव गांधी आयटी पार्क असेल, अशी अनेक कामे आम्ही केली आहेत. भाजपने सुसंस्कृत असल्याचे ढोंग करू नये. सरकारमधील सर्व यंत्रणा आपल्याच बापाच्या असल्यासारख्या वापरल्या जात आहेत. ठरवून, नियोजन करून विरोधकांवर दबाव टाकण्याचे राजकारण सुरू आहे. पण; पिंपरी चिंचवडची जनता हुशार आहे, ती हे सर्व ओळखते.’’
शिस्त लावणारा दादा हवा
शिंदे म्हणाले, ‘‘ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर आपल्या स्वाभिमानाची आहे. दबाव, धमकी आणि अहंकाराच्या राजकारणाला उत्तर देण्याची वेळ आली आहे. सध्या पिंपरी चिंचवडचे नाव खूप चर्चेत आहे. दादांवर खूप लोक बोलत आहेत. काही लोक आपल्या लोकांना बगलबच्चांना काम देण्यासाठी दादागिरी करतात. मात्र; हेच लोक आरोप लावतात की ‘अजित पवारांची दादागिरी चालणार नाही’. मात्र, तो दादा दादाच आहे आणि प्रशासनावर दादागिरी करणारा दादा आम्हाला हवा. पिंपरी चिंचवडला शिस्त लावणारा दादा आम्हाला हवा आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.