पिंपरी-चिंचवड

मतमोजणी केंद्रांवर ढिसाळ नियोजन

CD

मतमोजणी केंद्रांवर ढिसाळ नियोजन
- पाणी नाही, जेवणासाठीही आबाळ

पिंपरी, ता. १६ : महापालिकेची निवडणूक झाल्याने पिंपरी चिंचवडला चार वर्षानंतर नवे कारभारी मिळाले. त्यामुळे निकाल काय येणार,. याची उत्सुकता कार्यकर्ते, उमेदवार आणि सामान्य नागरिकांनाही होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील निकाल सर्वांत उशिराने जाहीर झाले. जेव्हा पुण्यातील विजयी उमेदवारांची नावे जाहीर केली जात होती. तेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये मात्र पहिल्या काही फेऱ्यांचे निकाल हाती येत होते.
‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १०, १४,१५,१९ ची मतमोजणी प्राधिकरणातील हेडगेवार भवन येथे पार पडली. मात्र, या ठिकाणी मतमोजणीसाठी आलेले उमेदवारांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, पोलिस कर्मचारी यांच्यासाठी दुपारी पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय नव्हती. दुपारचे जेवणही उशिराने आणि अपुरे मिळाले. त्यामुळे उमेदवार प्रतिनिधी, पोलिस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी परिसरातील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर मोठी गर्दी केली होती. आलेले जेवण अपुरे आणल्याने मतमोजणी केंद्राबाहेर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांपर्यंत पोचलेच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT