पिंपरी-चिंचवड

अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे पिंपरीत दर्शन

CD

पिंपरी, ता. ३ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे मंगळवारी (ता. ३) पिंपरीत दर्शन घेण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रांगणात अस्थिकलश ठेवण्यात आला होता.
हा अस्थिकलश पुण्यातून आणण्यात आला होता. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत अस्थिकलश स्मारकाच्या प्रांगणात आणण्यात आला. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी श्रद्धेने अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यावेळी अनेकांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.
पिंपरी-चिंचवड शहराशी अजितदादांचे अतूट नाते होते. शहराच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान आणि सर्वसामान्यांशी असलेली जवळीक यामुळे नागरिकांमध्ये विशेष आपुलकी दिसून आली. दर्शनासाठी आलेल्या अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. दुपारी तीन नंतर पवना नदीत अस्थींचे विधीवत विसर्जन करण्यात आले.
---
फोटो 92495, 92494,92497

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT