पिंपरी-चिंचवड

जुनी सांगवीत ‘पवना थडी’ जत्रेची तयारी वेगात सुरू

CD

पिंपरी, ता.२१ ः सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावरील नियोजित ‘पवना थडी’ जत्रेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मंडप, स्टॉल उभारणीचे काम चालू झाले असून महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. यावेळी मागणी अर्जाची संख्या चौपट झाली असून एकूण स्टॉल्सची संख्या ७०० वर जाऊन पोहोचली आहे. बुधवारपासून (ता.२५) जत्रेला सुरुवात होत आहे.
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दरवर्षी ‘पवना थडी’ जत्रा भरविली जाते.
स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, महिलांना आर्थिक स्वावलंबन साधता यावे आणि ग्रामीण संस्कृतीचे जतन व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याने ‘पवना थडी’ जत्रेचे व्यासपीठ महिला वर्गासाठी महत्त्वाचे ठरत आहे.
जत्रेच्या पार्श्वभूमीवर परिसरात मंडप उभारणे, विद्युत सजावट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची उभारणी तसेच सुरक्षा व्यवस्थेची आखणी केली जात आहे. दरवर्षी महिला बचत गटांच्या सदस्या स्टॉलची मांडणी, सजावट आणि उत्पादनांची पॅकिंग यामध्ये उत्साहाने सहभाग घेतात. अनेक गटांनी पारंपरिक पाककृती, सणासुदीचे पदार्थ, हातमागावरील वस्तू आणि पर्यावरणपूरक साहित्य यांची तयारी सुरू केली आहे. पारंपरिक खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, घरगुती उत्पादने आणि ग्रामीण कलाकुसर यांची विक्री करण्यासाठी स्टॉल उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. मागील वर्षांप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने नागरिक जत्रेला उपस्थित राहतील, असा आयोजकांचा विश्वास आहे.

सोडतीने स्टॉल्सचे वितरण
- सर्व महिला अर्जदारांना सामावून घेण्याचा उद्देश
- यावर्षी प्रत्येक गट सदस्याला स्वतंत्र स्टॉल उपलब्ध होणार
- दरवर्षी प्रमाणे सोडत काढून स्टॉलचे वितरण
- पाणी, स्वच्छतागृह आवश्यक सोयी सुविधा मिळणार
- वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था आणि स्वच्छतेवर विशेष भर

महिला बचत गटांच्या मागण्या
- सर्व महिला बचतगट सदस्यांना जत्रेत सामावून घ्यावे
- स्टॉलच्या संख्येत मागणीनुसार वाढ करावी
- अनावश्यक बॅनरबाजी, राजकीय पोस्टरबाजी करू नये
- साहित्य ने - आण करण्याकरिता आवश्यक सुविधा द्याव्यात
- जत्रेत हॉटेल व्यावसायिकांचा शिरकाव रोखावा

सर्व अर्जदारांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. महापालिकेच्यावतीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावर्षी स्वतंत्र स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- ममता परलवार - शिंदे, समाज विकास अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

PIM26B20993

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT