पिंपरी, ता. २६ : इमारतीच्या चोविसाव्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना पुनावळे येथील सियोना हाउसिंग सोसायटी येथे गुरुवारी (ता.२६) पहाटे घडली. नातेवाईक तरुणीशी विवाह न झाल्याने आलेल्या नैराश्यातून या तरुणाने जीवन संपवले असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
वैभव दत्तात्रेय सुतार (रा. दर्शननगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘वैभव हा कुटुंबीयांसमवेत चिंचवडला राहायचा. त्याचे बीबीएपर्यंत शिक्षण झाल्यानंतर चेन्नई येथे आयटी कंपनीत नोकरीला असल्याचे सांगून तो दोन वर्षांपासून घराबाहेर होता. मात्र, तो प्रत्यक्षात मावळातील चांदखेड परिसरात मित्राच्या व्यवसायात मदत करत होता. कधी तरी तो घरी यायचा. बुधवारी (ता. २५) तो घरी आला आणि तेथून ‘कामावर जातो’ असे सांगून निघाला. त्यानंतर पुनावळे येथे मित्राच्या घरी गेला. अन्य एका मित्राच्या घरी तो जेवणासाठी गेला. दरम्यान, पहाटे दोनच्या सुमारास वैभव अचानक घराबाहेर गेला आणि त्याने इमारतीवरून उडी घेतली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा मित्रांनी त्याला रुग्णालयात नेले होते. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.