पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

दत्तनगरमध्ये चेंबरची दुरवस्था
थेरगावातील दत्तनगर साई आर्ट्सजवळील चेंबरची अवस्था दयनीय झाली आहे. जवळून जाताना अतिशय दुर्गंधी येते. जवळील दुकाने चेंबरमध्ये कचरा टाकतात. महापालिका प्रशासनाने तत्काळ चेंबर दुरुस्त करून हे चेंबर सिमेंटचेच बसवावे. त्यामुळे कायमचा त्रास थांबेल.
- रमेश पाटील, थेरगाव
PNE26V99696


सिग्नलची वेळ वाढवा
बिजलीनगरकडून निगडीकडे येताना छत्रपती संभाजी महाराज चौकात फक्त २० सेकंदचा सिग्नल आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळात खूप कमी वाहने जात असल्याने येथे कायम कोंडी होत आहे. प्रशासनाने लक्ष देऊन सिग्नलची वेळ थोडी वाढवावी.
- समाधान गायकवाड, रावेत
PNE26V99693

इंद्रायणीनगरच्या रस्त्यांवर खड्डे
स्पाईन रोडवर स्पाइन सिटी मॉल समोरील चौकात गटाराशेजारी अर्धा फुटापेक्षा जास्त खोल खड्डे पडले आहेत. त्यामध्ये वाहने आपटून अपघात होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे गटाराशेजारील खड्डे इंद्रायणीनगर परिसरातील सर्व रस्त्यांवर आहेत. चेंबरची उंची न वाढवताच त्यावर डांबरीकरण केल्याने मोठे खड्डे तयार झाले आहेत. प्रशासनाने तत्काळ रस्त्यावरील चेंबर दुरुस्त करावेत.
- एक नागरिक
PNE26V99692

वाहनाची प्रतिकृती धूळखात
पिंपळे सौदागरमधील रस्त्यांवर वाहनाची प्रतिकृती बसवून सुशोभीकरण करण्यात आले आहे. परंतु सद्यःस्थितीत त्या प्रतिकृतीची वाईट अवस्था झाली आहे. दिवे बंद आहेत. धूळ, पालापाचोळा व पक्षांची त्यावर विष्ठा पडत आहे. त्यामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्याऐवजी विद्रुपीकरण झाले आहे. प्रशासनाने ते स्वच्छ करून त्यावर टफन्ड व पारदर्शक कव्हर बसवावेत.
- शरद पाचाणकर, पिंपरी
PNE26V99691

पुलावरील रोपटी काढा
महापालिका वृक्षारोपण करत असते. त्या ठिकाणच्या वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष होत असून देखभाल होत नाही. रोपे मरुन जातात. परंतु नको त्याठिकाणी वृक्षांची वाढ होत आहे. केएसबी चौकातील पुलाच्याबाहेरील बाजूवर वृक्षांची वाढ होत आहे. या वृक्षांची वाढ झाल्यानंतर वटवृक्ष होतील. त्यावेळी उड्डाणपुलाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने लवकरात लवकर या वृक्षांचे मुळासकट उच्चाटन करून उड्डाणपूल सुरक्षित करावा.
- बी.एस.पाटील, संभाजीनगर
PNE26V9969

डी.पी बॉक्सला झाकण हवे
गंगानगर प्राधिकरण सेक्टर नंबर २८ येथील प्लॉट नंबर ६१९ या ठिकाणी डी.पी बॉक्सला झाकण नाही. त्यामधील विद्युत तारा उघड्या आहेत. त्यामुळे विद्युत तारेला हात लागल्यास मोठ्या अपघाताची शक्यता आहे. तरी येथे योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
- सिराज शेख, प्राधिकरण
NE26V99694


किवळेत धोकादायक चेंबर
विकासनगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील टी.सी.कॉलनी बसथांब्याजवळ पावसाळी गटाराच्या चेंबर झाकण तुटले असून वाहनाचे चाक त्यात अडकून अपघात घडण्याची शक्यता आहे. रात्रीच्यावेळी चेंबरमध्ये पाय अडकून पादचाऱ्यांचाही अपघात होण्याची शक्यता आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चेंबरची दुरुस्ती करावी.
- रवींद्र कदम, विकासनगर
NE26V99695

Navi Mumbai: नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! नवी मुंबईत २ दिवस वाहतुकीत बदल; काही रस्ते बंद, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Latest Marathi News Live Update : साताऱ्यातील दरोडा घालणाऱ्या आरोपींना अटक; 21 तोळे सोनेसह पाच जण जेरबंद

Danger Tribe : जगातला सगळ्यात भयानक समुदाय, इथले लोक स्वतःच्या आई-वडिलांच्या मृत शरीराला कच्चे खातात

Ajit Pawar Plane Accident: विमान अपघाताची सखोल चौकशी हवी; राष्ट्रवादीची भूमिका सुनिल तटकरे यांचे बारामतीत प्रतिपादन..

FD Investment: 10 लाखांची एक FD की 1 लाखाच्या 10 FD? कोणत्या पर्यायात जास्त फायदा आणि सुरक्षितता? सोप्या शब्दांत समजून घ्या

SCROLL FOR NEXT