पिंपरी-चिंचवड

हास्यविनोदाने जगणे सुसह्य होते : कोळपकर

CD

पिंपरी, ता .४ : ‘‘आपल्या जीवनात हास्यविनोद खूप महत्त्वाचा असतो. तो आपले दुःख दूर करत नसला, तरी जगणे सुसह्य नक्कीच करतो,’’ असे विचार हास्यकवी भालचंद्र कोळपकर यांनी मांडले.
नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ व तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने होलिकात्सव आणि धूलिवंदनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘रंगात रंगुनी साऱ्या...’ या विनोदी, विडंबन कविसंमेलनात ते बोलत होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, प्रा. तुकाराम पाटील, राजेंद्र घावटे, माधुरी ओक, तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव शिरीष कुंभार यांची उपस्थिती होती.
या कविसंमेलनात रेणुका हजारे, नेहा जाधवराव, अरुण अहिवळे, जयश्री श्रीखंडे, नीला चित्रे, सुखदा टंकसाळे, देवेंद्र गावंडे, योगिता कोठेकर, ज्ञानेश्वर मोरे, प्रतिमा काळे, राधाबाई वाघमारे, सुहास घुमरे यांनी स्वरचित विनोदी आणि विडंबन कवितांचे प्रभावी सादरीकरण केले; तर संगीता सलवाजी आणि सविता इंगळे यांच्या कवितांचे सुप्रिया लिमये आणि सुभाष चव्हाण यांनी अभिवाचन केले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल साहित्यिकांची १०० पुस्तके महापालिकेने विकत घ्यावीत किंवा त्यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी पंधरा हजार सानुग्रह अनुदान देण्यात यावे, या मागणीचा अहेरराव यांनी पुरुच्चार केला. राजेंद्र घावटे यांनी प्रास्ताविक केले.
अनिकेत गुहे, प्रा. पी. बी. शिंदे, रजनी अहेरराव, अरविंद वाडकर, शरद काणेकर, नेहा कुलकर्णी, उज्ज्वला केळकर, रमेश वाकनीस, अरुणा वाकणीस, प्रकाश ननावरे, ॲड. अंतरा देशपांडे, राजू जाधव यांनी संयोजन केले. माधुरी विधाटे यांनी कविसंमेलनाचे निवेदन केले. संपत शिंदे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Latest Marathi News Live Update : पुण्यासह राज्यात उन्हाचा तडाखा, सलग दोन दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT