पिंपरी-चिंचवड

मोबाईल हॅक करून ऑनलाइन फसवणूक

CD

पिंपरी : एका व्यक्तीच्या मोबाईलवर लिंक पाठवून त्यांचा फोन हॅक केला आणि त्यांच्या क्रेडिट कार्डवरून सहा लाख ४१ हजार रुपये काढून घेतले. ही घटना चऱ्होली बुद्रूक येथे घडली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. फिर्यादीने त्यातील लिंकवर क्लिक करताच त्यांच्या फोनमध्ये एक ॲप्लिकेशन डाऊनलोड झाले, ज्याद्वारे आरोपीने फिर्यादीच्या मोबाइलचा एक्सेस मिळवला. यानंतर आरोपीने फिर्यादीच्या क्रेडिट कार्डचा वापर करून त्यांच्या संमतीशिवाय सहा लाख ४१ हजार रुपये स्वतःच्या खात्यावर वळवून आर्थिक फसवणूक केली.

जादा परताव्याच्या आमिषाने ११ लाखांचा गंडा
पिंपरी : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून तीन जणांची ११ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार नवी सांगवी येथे घडला. या प्रकरणी प्रतीक संजय तोडमल (रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रवीण विठ्ठल काटकर (रा. नवी सांगवी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादीसह दीपक लोंढे आणि अक्षय सुतार यांना आपल्या ‘पी. के. प्रॉफिट ट्रेडिंग’ कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा १० ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादीने अडीच लाख, दीपक लोंढे यांनी पाच लाख आणि अक्षय सुतार यांनी दोन लाख रुपये गुंतवले. आरोपीने एक वर्षानंतर मुद्दल परत करण्याचे लेखी करार करून देखील पैसे परत न देता एकूण अकरा लाख रुपयांची फसवणूक केली.

जुन्या भांडणातून तरुणावर दगडफेक, मारहाण
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका टोळक्याने तरुणाला आणि त्याच्या मित्रांना बेदम मारहाण करत दगडफेक केली. ही घटना सद्‍गुरुनगर, भोसरी येथे घडली. याप्रकरणी सतीश अर्जुन पाटील (रा. भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुरज लष्करे, ऋषीकेश लोहार, पार्थ खुने, सोहल मुजावर आणि गोविंद रूपवते या पाच आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी आणि त्यांचे मित्र गप्पा मारत थांबले असताना आरोपींनी तिथे येऊन आसिफ नावाच्या मित्रासोबत असलेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारले. तसेच त्यांच्या दिशेने दगडफेक केली. यामध्ये फिर्यादीच्या डोक्याला दगड लागून ते जखमी झाले. आसिफ हॉटेलमध्ये जीव वाचवण्यासाठी पळाला असता आरोपींनी हॉटेलमधील खुर्च्या आणि पाण्याचे ग्लास फेकून मारून त्याला जखमी केले.

मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी : आमच्याविरुद्ध तक्रार का दिली, असा जाब विचारत तिघांनी मिळून एका व्यापाऱ्याला रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शास्त्रीनगर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी राजबहादूर रामदास यादव (रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी स्वप्निल चंदनशिवे (रा. पिंपरी) याला अटक केली असून, ललितेश पिंगळे आणि अनिश पिंगळे (दोघेही रा. शास्त्रीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे घरी जेवण करत असताना आरोपींनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला. फिर्यादी बाहेर आले असता आमच्याविरुद्ध तक्रार का दिली? असे म्हणत आरोपी चंदनशिवे याने फिर्यादीला हाताने तर इतर दोन आरोपींनी रॉडने फिर्यादीच्या कपाळावर आणि नाकावर मारून गंभीर जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात जमीन मोजणीची प्रक्रिया वेगवान होणार; महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला, नागरिकांना मोठा दिलासा

रश्मिकाच्या आईने नेसलेली कोडावा पद्धतीची साडी तुम्हाला माहित आहे का? साडीचा पदर अन् नेसण्याची पद्धत आहे फारच खास, Video

Mahadev Munde Murder Case: ''महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन'', नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

“५ दिवस झाले... आम्हाला घरी जायचंय, किमान कळवा तरी आज की उद्या जाता येईल!” भारतात अडकलेल्या खेळाडूचा धीर संपतोय...

Mumbai News: लोकलचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगररांगांतून होणार, पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात; कधी सुरू होणार?

SCROLL FOR NEXT