पिंपरी-चिंचवड

अर्थसंकल्प उपसूचना गुलदस्तात

CD

पिंपरी, ता. १२ ः अर्थसंकल्पीय स्थायी समिती सभा तीन वेळा तहकूब झाली आहे. बुधवारी (ता. ११) चौथ्यांदा सभा झाली. त्यात सुमारे ७० उपसूचना प्राप्त झाल्या. मात्र, त्याची माहिती देण्यास स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी नकार दिला. सोमवारी (ता. १६) विशेष सभा घेऊन उपसूचनांवर चर्चा करू नंतर माहिती देऊ, असे सांगून त्यांनी विषय टाळला.
भारतीय जनता पक्षाने महापालिकेत सत्ता स्थापन केल्यापासून आत्तापर्यंत स्थायी समितीच्या चार सभा झाल्या. पहिली सभा स्थायी समिती अध्यक्ष निवड, दुसरी सभा अर्थसंकल्प सादरीकरणाची होती. विविध विषयांवर चर्चा, विविध प्रकल्प सुचविण्यासाठीची आणि अर्थसंकल्पीय तहकूब अशा दोन सभा गेल्या आठवड्यात झाल्या होत्या. चौथी सभा बुधवारी (ता. ११) झाली. त्यात अर्थसंकल्पाबाबत उपसूचना सदस्यांकडून प्राप्त झाल्या. मात्र त्यावर चर्चा झाली नाही. शिवाय, उपसूचनांबाबत माहितीही माध्यमांना दिली नाही. नियमित साप्ताहिक बैठकीच्या विषय पत्रिकेवरील दोन विषय तहकूब ठेवून अन्य विषयांना मंजुरी दिली.

स्थायी बैठकीचा दिवस आणि वेळ बदलणार
महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक बैठक दर बुधवारी होत आहे. मात्र, सप्ताहाच्या मध्यावरच बुधवार असल्याने सोईचे होत नाही. त्यामुळे स्थायी समितीची साप्ताहिक बैठक दर सोमवारी किंवा शुक्रवारी घेण्याचा विचार सुरू आहे. शिवाय, बैठकीची वेळही दुपारी दोनऐवजी सकाळी ११ वाजता ठेवण्याचे विचाराधीन आहे, हा बदल पुढील आठवड्यापासून होईल, असे सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT