पिंपरी, ता. ७ ः पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२ आणि ३०-३२ मधील गृहप्रकल्पांतील शिल्लक १ हजार २९ सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. बुधवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ही सोडत पार पडणार आहे. या प्रक्रियेत ५ हजार ३१७ पात्र अर्जदारांचे भवितव्य ठरणार आहे.
या गृहयोजनेसाठी एकूण ५ हजार ३६७ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. अर्जांच्या छाननीनंतर ५० अर्जदारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे, उर्वरित ५ हजार ३१७ अर्जदार आता या सोडत प्रक्रियेत नशीब आजमावतील. ही सोडत प्रक्रिया ‘म्हाडा’ ने विकसित केलेल्या ‘आयएचएलएमएस २.०’ या संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये मानवी हस्तक्षेपास वाव नसल्याने प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असेल, असे पीएमआरडीएच्या सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता यांनी स्पष्ट केले. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पीएमआरडीएच्या सनियंत्रण समितीच्या देखरेखीखाली ही सोडत पार पडणार आहे.
सदनिका आणि पात्र अर्जदार
- पेठ क्र. १२ (ईडब्ल्यूएस) : ८१ सदनिकांसाठी २,१८२ अर्जदार
- पेठ क्र. १२ (एलआयजी) : ३९३ सदनिकांसाठी १,९७५ अर्जदार
- पेठ क्र. ३०-३२ (ईडब्ल्यूएस) : ३२७ सदनिकांसाठी ४५६ अर्जदार
- पेठ क्र. ३०-३२ (एलआयजी) : २२८ सदनिकांसाठी ७०४ अर्जदार
थेट प्रक्षेपणाची सुविधा
सोडत प्रक्रियेवेळी इच्छुक अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पीएमआरडीएने केले आहे. ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांच्यासाठी थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. या प्रक्रियेची यूट्यूब लिंक सर्व पात्र अर्जदारांना एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.