पिंपरी-चिंचवड

राष्ट्रवादी नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांची साडेदहा कोटी वर्गीकरणाची उपसूचना

CD

पिंपरी, ता. १६ : महापालिकेतील ‘बोगस’ उपसूचनांद्वारे ठेकेदारांची देयके काढून ५२ कोटींच्या ‘कथित’ अपहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असलेली तब्बल १० कोटी ५० लाख रुपये वर्गीकरणाची आणखी एक ‘बोगस’ उपसूचना उघडकीस आली आहे.

स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेची मान्यता नसलेल्या तब्बल २० ‘बोगस’ उपसूचनांद्वारे सुमारे ७० कामांची ठेकेदारांची बिले काढून ५२ कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाल्याचा आरोप स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी गेल्या आठवड्यात केला होता. या प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाच सदस्यीय चौकशी नियुक्त केली आहे. मात्र, या प्रकरणातील ‘बोगस’ उपसूचनांवर केवळ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी केला होता. त्याचा मागोवा घेताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असलेली तब्बल चार कोटी २० लाख रुपये वर्गीकरणाची एक ‘बोगस’ उपसूचना ‘सकाळ’च्या हाती लागली होती. त्यावरील स्वाक्षऱ्या आमच्या नसल्याचे संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे व नगरसेविका अरुणा लंगोटे यांचे पती गणेश लंगोटे यांनी सांगितले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचेच नगरसेवक यश साने व पंकज भालेकर यांच्या अनुक्रमे सूचक व अनुमोदक असलेली आणि १०.५० कोटी रुपये वर्गीकरणाची आणखी एक ‘बोगस’ उपसूचना आढळली आहे.
देहू-आळंदी रस्ता डांबरीकरणासाठी साडेपाच कोटी आणि ‘पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर २०२६’ च्या अनुषंगाने वाकडमधील विनोदेवस्ती ते डी.वाय. पाटील महाविद्यालय रस्त्याची कामे करण्यासाठी पाच कोटी असे साडेदहा कोटी रुपये वर्ग करण्याची बोगस उपसूचना आहे. दरम्यान, यश साने यांनी सही केली नसल्याचे सांगितले. तर, पंकज भालेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT