पिंपरी-चिंचवड

पंतप्रधानांच्या आवाहनाला कारभाऱ्यांची साथ की स्टंट

CD

पिंपरी, ता. १५ ः देशाच्या आर्थिक हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांसह अधिकारी व नागरिकांना काटकसरीचे आवाहन केले आहे. त्याला तीन दिवसांनी सर्वपक्षीय महापालिका कारभाऱ्यांनी प्रतिसाद दिला. शुक्रवारी (ता. १५) सर्वसाधारण सभेसाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या वाहनांनी महापालिकेत आले. यामध्ये बैलगाडी, सायकल, रिक्षा, दुचाकी, ईव्ही, मेट्रो आदी वाहनांचा समावेश होता. परंतु, यात सातत्य राहील की केवळ एक दिवसाचा स्टंट ठरेल, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी आणि शहरातील कारभारी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देतील का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. महापालिकेत एका पुरस्कृत अपक्षासह ८५ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. शिवाय, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे व अमित गोरखे हेही भाजपचेच आहेत. परंतु, कोणीही काटकसर करताना दिसले नाहीत. त्यामुळे पुढील काळात पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळेल, याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, गेल्या तीन दिवसांत घेतलेल्या काही निर्णयांमुळे कारभारी काटकसरीला सकारात्मक असल्याचे दिसते आहे.

काटकसरीचे काही उदाहरणे...
- महापौर रवी लांडगे यांनी रविवारपासूनचा नियोजित परदेश दौरा रद्द केला आहे
- वाढीव दोन प्रभाग समिती कार्यालयांचा विषय सर्वसाधारण सभेने रद्द केला आहे
- उपमहापौर, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, स्थायी समिती अध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांसाठी सुरक्षारक्षक नियुक्तीचा निर्णय रद्द केला आहे

सर्वसाधारण सभेसाठी विविध वाहने
- महापौर रवी लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सायकलने आले
- राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोडीतील सदस्या स्वाती काटे, प्रतीक्षा लांघी-जवळकर, राजू बनसोडे बैलगाडीतून आले
- पक्षनेते प्रशांत शितोळे यांचा मेट्रोने प्रवास
- पिंपळे गुरवच्या सदस्या शकुंतला धराडे, रविना आंगोळकर यांचा रिक्षाने एकत्र प्रवास
- योगिता नागरगोजे यांचा स्वतःच्या ई-दुचाकीने प्रवास
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT