पिंपरी-चिंचवड

वाचकपत्र

CD

वाचकपत्र
फोटोसाठी नव्हे, देशासाठी काम करा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय नेत्यांना काटकसर करण्याचे आवाहन केले. त्यानंतर कुणी बुलेटवर मंत्रालयात जात आहे, कुणी मेट्रोने, कुणी सायकलवर, तर कुणी बैलगाडीतून कार्यालयात पोहोचत आहेत. जनतेला मात्र प्रश्न पडला आहे की खरी काटकसर आहे की फक्त कॅमेऱ्यासमोरचा अभिनय ? एक दिवस साधेपणाचा दिखावा करून काही बदलत नाही.
कारण जनतेला माहिती आहे की अनेक ठिकाणी अजूनही सार्वजनिक पैशांचा अपव्यय, भ्रष्टाचार, टक्केवारी, अनावश्यक खर्च सुरूच आहे. खरोखरच काटकसर करायची असेल तर अनावश्यक सरकारी खर्च बंद करा. भ्रष्टाचाराला आळा घाला जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक करा. फक्त गाडी बदलून नेता साधा होत नाही. विचार बदलला, आचरण बदलले आणि प्रामाणिकपणा आला तरच नेता मोठा ठरतो. आज जनता फोटोपेक्षा काम बघते, भाषणापेक्षा कृती बघते आणि दिखाव्यापेक्षा प्रामाणिकपणाला जास्त महत्त्व देते. देशहित आणि राष्ट्रहित हे फक्त घोषणांमध्ये नसावे. ते प्रत्येक निर्णयात, प्रत्येक खर्चात आणि प्रत्येक कृतीत दिसले पाहिजे.
- राजेश जाधव, रुपीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT