पिंपरी-चिंचवड

पिंपरीतील स्वीकृत नगरसेवकांची गुरुवारी नियुक्ती?

CD

स्वीकृत नगरसेवकांची उद्या नियुक्ती

दफ्तरी दाखल प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर; भाजपच्या सात नावांवर निर्णय होणार

पिंपरी, ता. १८ : महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा जून महिन्यात दफ्तरी दाखल करण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव गुरुवारी (ता. १८) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर पुन्हा मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपकडील सात नावे अद्याप अंतिम न झाल्याने या सभेत नियुक्त्या जाहीर होणार की प्रस्ताव पुन्हा तहकूब होणार याकडे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपमधील इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपचे ८४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७, शिवसेना सहा आणि एक अपक्ष असे १२८ सदस्य निवडून आले आहेत. संख्याबळानुसार दहा स्वीकृत नगरसेवकांपैकी भाजपला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळणार आहेत. प्रशासनाने मार्च महिन्यात स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यावेळी प्रशासनाने दिलेल्या मुदतीत राष्ट्रवादी काँग्रेसने तीन उमेदवारांचे अर्ज दाखल केले. मात्र, भाजपकडून नावे निश्चित न झाल्याने मुदतवाढ मागण्यात आली. त्यामुळे तत्कालीन आयुक्तांनी केवळ राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला होता.

भाजपचे एकमत होईना
भाजपकडून सात नावांवर एकमत न झाल्याने हा विषय सलग तीन महिने तहकूब ठेवण्यात आला. त्यानंतर जून महिन्यात प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला आणि अर्धवट प्रस्तावात दुरुस्ती करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. मात्र जूननंतरही प्रशासनाने नव्याने अर्ज मागविणे किंवा भाजपच्या उमेदवारांची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. अद्याप भाजपच्या एकाही इच्छुकाने अधिकृत अर्ज दाखल केलेला नसल्याची माहिती आहे.

महापौरांनीच दिले पत्र
दरम्यान, महापौर रवी लांडगे यांनी १२ ऑगस्ट रोजी दिलेल्या पत्रानुसार दहा स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रस्ताव गुरुवारच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर पुन्हा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे सभागृहात भाजप सात नावे जाहीर करणार की पुन्हा प्रस्ताव तहकूब करण्याचा निर्णय घेणार, यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

सहा महिन्यांचा कार्यकाळ वाया
मार्चमध्ये प्रक्रिया सुरू होऊनही राजकीय एकमताच्या अभावामुळे स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती रखडली. परिणामी दहा स्वीकृत नगरसेवकांचा तब्बल सहा महिन्यांचा कार्यकाळ वाया गेला असून, महापालिकेतील महत्त्वाच्या समित्यांमधील प्रतिनिधित्वही अपूर्ण राहिले आहे.

स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर आला आहे. नावे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोअर कमिटीकडून नावे प्रदेश नेतृत्वाकडे पाठविली जातील. अर्जांची छाननीही करावी लागणार आहे.
- शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT