पिंपरी-चिंचवड

‘यिन’च्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर

CD

पिंपरी, ता.१९ : सकाळ ‘यिन’च्या (यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क) बाराव्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी येथील ‘सकाळ’ कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. युवक, विद्यार्थी, प्राध्यापक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय रक्त संकलनकेंद्र, पिंपरी यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.

या वेळी ए.एस.एम. कॉलेजचे प्राचार्य ललित कनोरे, अधिष्ठाता विकास बरबाटे, कॉन्क्वेस्ट कॉलेजचे प्राचार्य प्रदीप कदम, आलार्ड विद्यापीठाच्या डीन मनीषा भेंडे, विभागप्रमुख पद्मा झाडे, प्राध्यापक डॉ. सचिन भारद्वाज, श्रवण रेड्डी, डॉ. प्रमोद सपकाळ, डॉ. शैलेंद्र कांबळे, युवा नेते विशाल काळभोर, नगरसेविका वर्षा जगताप, ॲड. स्नेहल कांबळे आणि मयूर बोंगाणे यांनी उपस्थित राहून यिनच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी युवकांना सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. गणेश लांडे, लता सुवर्णकार, विपुल गायकवाड, कार्तिक शिंदे, योगिता सासणे, शिवाजी सोळंके आणि जयश्री वायदंडे यांनी सहकार्य केले.
‘यिन’च्या पिंपरी चिंचवड कोअर टीमच्या वतीने केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहुराज साळवे यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन ‘यिन’ पिंपरी चिंचवड कोअर टीम आणि ‘यिन’ अधिकारी चेतन लिम्हण यांनी केले.

43403

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Mangalwedha News : ज्यांच्या पक्षाचा निकाल कोर्टाकडे आहे त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलू नये; माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Mumbai Crime : गर्दीच्या लोकलमध्ये महिलांच्या दागिन्यांवर डल्ला; २१ वर्षीय महिला जाळ्यात, ३.४३ लाखांचे दागिने जप्त

Pune News : विनानिविदा झाडणकामात घुसखोरीचा प्रयत्न; दोन ठेकेदारांना घुसविण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT