पिंपरी-चिंचवड

हिंजवडीसह परिसरातील गावांचा पिंपरी महापालिकेत समावेश करू

CD

पिंपरी, ता. १ : हिंजवडी, माण आणि मारुंजीसह लगतच्या सात गावांचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश करण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्याची पुनरुक्ती मंगळवारी (ता.१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एका वार्तालापप्रसंगी केली. त्यामुळे महापालिकेत कोणत्या गावांचा समावेश होणार, त्याची घोषणा आणि अंमलबजावणी केव्हा होणार, की फक्त घोषणाच राहणार याची उत्सुकता वाढली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेलगत ‘आयटी पार्क’ म्हणून ओळखली जाणारी हिंजवडी, माण, मारुंजीसह नेरे, जांभे, सांगवडे आणि गहुंजे ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. जांबे व सांगवडे ग्रामपंचायतींनी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांना पत्र देऊन ‘‘आमच्या गावांचा महापालिकेत समावेश करावा,’’ अशी थेट मागणी केली होती. तसेच तत्कालीन पालकमंत्री दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या ग्रामपंचायतींनी पत्र दिले होते. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
दरम्यान, गेल्या वर्षी जोरदार पावसाने हिंजवडी परिसराची दाणादाण उडवली. यामुळे प्रशासनाचे पितळ उघडे पडले होते. त्यानंतर विभागीय आयुक्तांसह जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, ‘पीएमआरडीए’, ‘एमआयडीसी’ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. तरीही, या वर्षी पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे हिंजवडीसह अन्य गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची चर्चा सुरू झाली. त्यात मुंबईतील एका वार्तालाप कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंजवडी परिसरातील समस्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावर उत्तर देताना त्यांनी हिंजवडीसह परिसरातील गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याचे सुतोवाच केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loose Oil Sale Maharashtra : मोठा निर्णय! देवेंद्र फडणवीसांकडून तुकाराम मुंढेंच्या आदेशाला केराची टोपली? सुटे खाद्यतेल विक्रीला परवानगी

एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, नागपूर-बंगळुरू विमानाचे उड्डाण वेळेवर रद्द, प्रवाशांचा गोंधळ, नेमकं काय घडलं?

Australia A Squad: 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी'आधी ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय;३५ वर्षीय खेळाडूला दिले भारत दौऱ्याचे तिकीट!

कर्जाचा तगादा, पतीसह पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; पलूस तालुका हादरवणारी घटना

FDA Action : ‘ब्लिंक कॉमर्स’चा परवाना निलंबित! अस्वच्छतेच्या त्रुटी कायम; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

SCROLL FOR NEXT