पिंपरी, ता. १८ ः ‘आजच्या काळात सायबर गुन्ह्यांचे सर्वाधिक बळी हे सुशिक्षित नागरिकच ठरत आहेत. कोणत्याही फसव्या आमिषाला किंवा तांत्रिक गैरप्रकाराला बळी पडल्यानंतर सायबर गुन्हे घडतात. प्रत्येकाने सोशल मीडिया खाती सुरक्षित ठेवण्यासाठी ‘टू-स्टेप व्हेरिफिकेशन’ नक्की सुरू करावे,’ असा सल्ला पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिला.
जिल्हा माहिती कार्यालय आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य शासनातर्फे राज्यात सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमात हा कार्यक्रम झाला
पाटील म्हणाले, ‘‘गुंतवणुकीच्या नावाखाली गैरव्यवहार, कस्टम किंवा फेडेक्स पार्सलच्या नावाने येणारे धमकीचे कॉल, वीज देयक भरणे, गिफ्ट व्हाउचर आणि रिवॉर्ड पॉइंट्सच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. सध्या मॅट्रिमोनियल साइट्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाणही मोठे आहे. आर्थिक बाबींत अनोळखी व्यक्तींवर कोणताही विश्वास ठेवू नये.’’ गहाळ झालेले मोबाईल ब्लॉक करण्यासाठी तसेच स्पॅम कॉल्सची तक्रार करण्यासाठी ‘संचार साथी’ या शासकीय पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘पीएमआरडीए’चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे होते. या प्रसंगी उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे यांच्यासह सायबरतज्ज्ञ पोलिस कॉन्स्टेबल समीर घाडगे व शिवाजी बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांनी सूत्रसंचालन केले, तसेच आभार मानले.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.