पिंपरी-चिंचवड

करवसुलीत दिरंगाई केल्यास कारवाई : सांडभोर

CD

पिंपरी, ता. १५ : ‘‘मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी विभागनिहाय नियोजनबद्ध मोहीम राबवावी. नोटीस बजावूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर नियमानुसार जप्तीची कारवाई करावी. करवसुलीत दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिला.

महापालिकेच्या करसंकलन व कर आकारणी विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. उपायुक्त सचिन पवार, प्रशासन अधिकारी रश्मी देशपांडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत थकबाकी वसुली, जप्तीची कारवाई, मालमत्ता हस्तांतरण आणि ‘सारथी’ पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा आढावा घेण्यात आला.
‘‘प्रत्येक मंडल अधिकाऱ्याने कार्यक्षेत्रातील परिस्थितीनुसार करवसुलीच्या उपाययोजनांची लेखी माहिती सादर करावी. थकबाकीदारांना कर भरण्याबाबत वारंवार अवगत करावे. तुलनेने लवकर वसुली होऊ शकणाऱ्या मालमत्तांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करावे,’’ अशा सूचना सांडभोर यांनी दिल्या.

‘‘नवीन सर्वेक्षणातील मालमत्तांची कर आकारणी वेगाने पूर्ण करावी. विविध वापरांच्या मालमत्तांची माहिती अद्ययावत ठेवावी. हस्तांतरणाची प्रकरणे आणि तक्रारींचा वेळेत निपटारा करावा. मागील पाच वर्षांच्या करसंकलनाशी तुलना करून यंदाच्या वसुलीची प्रगती तपासली जाणार आहे. यापुढे दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्यात येणार आहे,’’ असे सांडभोर म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

SCROLL FOR NEXT