पिंपरी-चिंचवड

रीलच्या नादात स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात

CD

पिंपरी, ता. १७ : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी तरुणांकडून जिवावर बेतणारे ‘उद्योग’ केले जातात. रील आणि व्हिडिओ शूट करण्याच्या नादात काही तरुण स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून येते. हातात फटाक्यांच्या माळा घेऊन त्या पेटवून व्हिडिओ शूट करणे, भररस्त्यात फटाके फोडणे, सुसाट वेगाने दुचाकी चालवत स्टंटबाजी करणे, वाहनांवर उभे राहून चित्रण करणे, असे प्रकार पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पाहायला मिळतात. काही सेकंदांच्या व्हिडिओसाठी जीव धोक्यात घालण्याचे असे प्रकार चिंतेचा विषय बनले आहेत.

सण-उत्सव आणि वाढदिवसाच्या निमित्ताने फटाक्यांचा वापर केला जातो. काही तरुणांकडून फटाक्यांच्या माळा हातात धरून त्या पेटवल्यानंतर त्यांचे व्हिडिओ शूट केले जात आहेत. दरम्यान, काही वेळा फटाके हातातच फुटण्याचा धोका असतो. चेहरा, डोळे, हात यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. अशावेळी परिसरातील नागरिकांनाही त्याचा फटका बसू शकतो. मात्र, याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. तसेच दुचाकीवरून भरधाव जाणे, पुढचे चाक उचलणे, एकाच चाकावर वाहन चालविणे, वाहन चालविताना हात सोडणे, वाहनावर उभे राहून व्हिडिओ तयार करणे अशा प्रकारांना काही तरुणांकडून प्राधान्य दिले जात आहे. सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीची वर्दळ असतानाही हे प्रकार केले जातात. मागून मित्रांकडून दुसऱ्या वाहनावरून व्हिडिओ शूट केला जातो. या प्रकारात चालकाचे नियंत्रण सुटल्यास मोठा अपघात होऊ शकतो.


जिवाशी खेळ
सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच प्रकाराची नक्कल करण्याचे प्रमाण वाढते. मित्रांकडून प्रोत्साहन मिळत असल्याने अनेकदा परिणामांचा विचार केला जात नाही. काही सेकंदांच्या प्रसिद्धीपेक्षा स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य अधिक महत्त्वाचे असल्याचे भान तरुणांनी ठेवण्याची गरज आहे.

घटना
- आठ दिवसांपूर्वी देहूगाव येथे एका तरुणाने पेटता फटका हातात धरून जोरात गोल फिरवला. याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले जात होते. मात्र, या फटाक्यांच्या ठिणग्या दूरपर्यंत उडून परिसरातील काही जणांना किरकोळ भाजले.
- निगडीतील लोकमान्य टिळक चौकाकडून भक्ती-शक्ती चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर काही तरुण दुचाकीवर स्टंटबाजी करीत चित्रीकरण करीत होते.

सार्वजनिक रस्त्यांवर स्टंटबाजी करणे, भरधाव वाहन चालविणे आणि फटाक्यांचा धोकादायक वापर करणे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधितांची ओळख पटवून पोलिसांनी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.
- सुनील राजेभोसले, नागरिक, रहाटणी

रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या प्रकरणात मागील काही दिवसांत गुन्हेही दाखल झालेले आहेत. अशा प्रकारची स्टंटबाजी कुठे दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
- सुदर्शन राठोड, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : "तुम्ही खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाही"; वकिलाचे CJI सूर्यकांत यांना भर कोर्टात खडे बोल, आता होणार फौजदारी कारवाई?

एमएस धोनी IPL मधून निवृत्त! CSK कडून मोठी घोषणा, आता दिसणार या भूमिकेत

Accident News: तिघांना उडवून कार खड्ड्यात कोसळली ;एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी ; खापरी शिवारातील घटना

Maharashtra: वारसा संवर्धनासोबत स्वच्छताही महत्त्वाची! संरक्षित स्मारकांजवळ शौचालयांना मुंबई उच्च न्यायालयाची मंजुरी

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरात वाढणार ‘अक्वान’ चक्रीवादळाची तीव्रता वाढणार; २० नोव्हेंबरला आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT