पिंपरी-चिंचवड

आम्ही नेमके चालायचं कुठून पिंपळे गुरवमधील पादचाऱ्यांचा प्रश्‍न, अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष

CD

पिंपळे गुरव, ता. १२ ः पिंपळे गुरव येथील रामकृष्ण चौकात पादचाऱ्यांसाठी असलेल्या रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. पदपथावर खाद्यपदार्थ विक्रेते अक्षरशः खुर्च्या, टेबलं मांडून व्यवसाय करताना दिसून येत आहेत. फळ विक्रेते, भाजी विक्रेते अनेकदा पदपथ काबीज करून, पदपथावरच भाज्यांचे ढिगारे मांडतात. त्यामुळे नेमका पदपथ आहे तरी कुणासाठी हा प्रश्न आहे. आम्ही नेमके चालायचे कसे, हे एकदा महापालिकेने स्पष्ट करावे, असा प्रश्‍न पादचारी करत आहेत.
येथील पदपथांवर व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याने नागरिकांना अनेकदा पदपथ सोडून रस्त्यावर उतरून जीव मुठीत धरून पायी चालावे लागत आहे. वाहने पार्किंग, दुकानांचे फलक, विक्रीसाठी आणलेल्या विविध वस्तू, ज्यूस सेंटर, स्नॅक्स सेंटर, वडापाव, फळ विक्रेते, भाजी विक्रेते अशा व्यावसायिकांनी पदपथावर अतिक्रमणे केली आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.
कोट
‘‘पिंपळे विभागात दररोज नियमित कारवाई करीत आहोत. मनुष्यबळ कमी आहे. या ठिकाणची पाहणी करून तातडीने येथील अतिक्रमणे काढण्यात येतील.
सारिका नागरगोजे,
बिट निरीक्षक, अतिक्रमण
''ड'' प्रभाग


‘‘पदपथावर विक्रेत्यांनी ठिय्या मांडल्याने पथारीवाल्याकडे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमुळे वाहतूक कोंडीत अधिकची भर पडत आहे.

किरण साळवे, स्थानिक गृहिणी

‘‘व्यावसायिकांकडून पदपथ गिळंकृत झाल्याने पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत असून, रस्त्यातील वाहनांना भेटून पादचाऱ्यांना वाट काढावी लागत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

तृप्ती साबळे, स्थानिक गृहिणी

फोटोः 00696

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT