पिंपरी-चिंचवड

गळागौरीच्या खेळातून दिला सामाजिक संदेश

CD

पिंपळे गुरव, ता. ३० ः पिंपळे गुरव येथील सुयोग कॉलनीत ओमसाई फाउंडेशन व सुयोग कॉलनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळागौरीच्या खेळातून सामाजिक संदेश देण्यात आला. मंगळागौर, अन्नपूर्णा गणपती, कलश, घंटा, दीप यांचे पूजन करून शिव मंगळागौरीचे आवाहन करण्यात आले. पारंपारिक खेळ खेळून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. खेळामध्ये फुगडी, चौफुला फुगडी, जाते फुगडी, सुपली फुगडी असे फुगडीच्या विविध प्रकारात खेळ रंगला होता.
स्मार्ट सिटीच्या परिसरात आपली महाराष्ट्राची परंपरा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रयत्नांना परिसरातील आदी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बदलापूर आणि कोलकत्ता येथे मुलींवर झालेल्या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला. नाट्य रूपातून नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची टाळ्यांच्या गजरात महिलांनी दाद मिळविली. यावेळी अभिनेते व सहाय्यक दिग्दर्शक संदेश सूर्यवंशी यांच्या हस्ते सहभागी महिलांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रीती मराठे, अवनी शिंदे, उज्वला पाटील, शालिनी यादव, शिल्पा राऊत, ज्योती आव्हाड, सीमा कांबळे, नयन शिंदे, आशा आव्हाड, ज्योती शिंगाडे, राणी टोपले, निलम कुलकर्णी उपस्थित होते. काव्या शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रीती मराठे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT