पिंपळे सौदागर, ता. १८ ः पिंपळे सौदागर येथील नेताजी काटे रस्त्याची दुरवस्था आणि खासगी विकसकाच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त होते. ‘सकाळ’ने या समस्येची दखल घेतली आणि बातमी प्रकाशित होताच रस्त्याचे काम महापालिकेकडून तत्काळ सुरू करण्यात आले.
स्थानिक रहिवाशांचे जनजीवन खासगी विकसकाच्या बांधकामांमुळे विस्कळीत झाले होते. अरुंद रस्ता, अस्ताव्यस्त पडलेले बांधकाम साहित्य यामुळे मोठ्या सोसायट्यांमधील नागरिकांना रोजच्या जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या साहित्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होत होता तसेच पाणी साचून चिखल झाल्यामुळे नागरिकांच्या समस्यांत आणखी भर पडली होती.
या परिस्थितीची तक्रार अनेक वेळा महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. परंतु त्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती. अखेर ‘सकाळ’ने रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेत बातमी प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने त्वरीत पाऊल उचलले आणि रस्त्याचे काम सुरू केले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
पिंपळे सौदागर येथील नेताजी काटे रस्त्याचे काम सुरू झाले आहे. लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण होईल. सद्यस्थितीत गटाराची झाकणे वर घेण्याचे काम चालू आहे.
- प्राजक्ता गव्हाणे, कनिष्ठ अभियंता ‘ड’ प्रभाग
आमच्या सोसायटीजवळ खासगी विकसकाचे बांधकाम सुरू असल्यामुळे बांधकाम साहित्य रस्त्यावर पडले होते. रस्ता पूर्णपणे खराब झाला होता आणि ये-जा करणे अवघड झाले होते. पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही काहीच होत नव्हते. अखेरीस ‘सकाळ’ कडे व्यथा मांडली आणि त्यांनी आमच्या तक्रारीची दखल घेताच रस्त्याचे काम तातडीने सुरू झाले.
- किरण नारखेडे, स्थानिक रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.