पिंपरी-चिंचवड

या चिमण्यांनो ! परत फिरा, चारा खा, पाणी प्या...

CD

पिंपळे सौदागर, ता. ४ ः सध्या उन्हाळ्याची दाहकता वाढत असून या काळात पशु-पक्ष्यांना अन्न-पाण्याची टंचाई भासत असते. हे लक्षात घेऊन पिंपळे सौदागरमधील रोजलँड रेसिडेन्सी सोसायटीने पक्ष्यांसाठी पाणी आणि खाद्य पुरवठ्याचा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत सोसायटी परिसरात साठ मातीची भांडी ठेवून त्यात दररोज पाणी आणि अन्न ठेवले जात आहे.
सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य सुरेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. सोसायटीतील रहिवासी व चिमणी संवर्धन प्रेमी चंदन चौरसिया यांच्यासह बाळासाहेब धांडे, बालू मोरे, नाना धांडे, मारुती वाघमारे, फुलचंद धांडे, बाळाजी धांडे यासारख्या सदस्यांनी त्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या उपक्रमासाठी सोसायटीतील सदस्यांसह सफाई कर्मचारी, कामगार आणि सुरक्षा रक्षक यांनी देखील पुढाकार घेतला आहे. पक्ष्यांसाठी नियमितपणे पाण्याची व्यवस्था करणे आणि स्वच्छता राखणे ही जबाबदारी सोसायटीतील सदस्य आणि कर्मचारी पार पाडत आहेत. भविष्यात अधिकाधिक नागरिकांना त्यात सहभागी करून सोसायटीच्या बाहेरही हा उपक्रम राबवण्याचा सदस्यांचा मानस आहे.
याबाबत चंदन चौरसिया म्हणाले, ‘‘मातीच्या भांड्यांमध्ये पाणी नैसर्गिकरित्या थंड राहते. शिवाय ते पर्यावरणपूरक असते. या भांड्यांचे वजन अधिक असल्याने पक्षी त्यावर सुरक्षितपणे बसून पाणी पिऊ शकतात. त्याने पाणी सांडण्याचा किंवा भांडे उलटण्याचा धोका राहत नाही. याखेरीज उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढत असल्याने पक्ष्यांना या भांड्यात स्नान करण्याचीही संधी मिळते, जेणेकरून उष्माघात टाळता येतो.’’

पर्यावरण संवर्धनात अग्रेसर...
रोजलँड रेसिडेन्सी सोसायटी ही विविध पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी ओळखली जाते. या सोसायटीने २०१६ मध्ये स्पॅरो कंझर्वेशन पुरस्कार मिळविला आहे. गेल्या १५ वर्षांपासून सोसायटीकडून चिमणी आणि इतर पक्ष्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्यात मातीच्या भांड्यांसह, कृत्रिम घरटी आणि खाद्य पेट्या बसवण्याचे उपक्रमांचा समावेश आहे. स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी या उपक्रमांना नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत असतात. इतर सोसायट्यांनीही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांचा स्वीकार करावा, अशी अपेक्षा सोसायटींच्या सदस्यांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवासी बेपत्ता, मानव तस्करीचा उलगडा, दमछाक होऊन अनेकांचा मृत्यू

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Chandrakant Patil : सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणे हे भाजपचे कर्तव्य आहे

Mumbai: महाराष्ट्रात टॅक्सी-ऑटो चालकांना मराठी बोलणे अनिवार्य! प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा; प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचे आदेश

अखेर भूषण प्रधानची स्वप्नसुंदरी समोर आलीच! कोण आहे ती? खास पोस्ट करत दाखवला चेहरा

SCROLL FOR NEXT