पिंपरी-चिंचवड

पिंपळे गुरव परिसरात शिवजयंती उत्साहात

CD

पिंपळे गुरव, ता.१८ : नवी सांगवी, पिंपळे गुरव, रहाटणी, पिंपळे सौदागर व पिंपळे निलख परिसरात सोमवारी (ता.१८) तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. यामध्ये पिंपळे गुरव परिसरात हिंदवी स्वराज प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
नवी सांगवी परिसरात जगदंब युवा प्रतिष्ठान, ओम साई ग्रुप आदर्शनगर येथे आकर्षक सजावट व ढोल ताशा वादन करण्यात आले. समर्थनगर मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. समतानगर, शिवप्रतिष्ठान ग्रुप, क्रांती चौक येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, तुकारामनगर मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. अखिल कृष्णा चौक मराठा प्रतिष्ठानच्या वतीने कैलास मंदिर देखावा सादर करण्यात आला.
पिंपळे गुरव येथील परिसरात शिवशंभो प्रतिष्ठान व पैलवान ग्रुप मंडळाच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. शिव गणेश मित्र मंडळ व स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने फुलांची सजावट करण्यात आली. रहाटणी येथे शिवरायांच्या गीतांचे पोवाड्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पिंपळे सौदागर येथे श्रीमंतयोगी प्रतिष्ठान, मुंजोबा प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. बहुतांश मंडळांनी मिरवणुकीत डीजेचा वापर केल्याचे यावेळी दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Today: पेट्रोल-डिझेल महागल्यानंतर LPG गॅसचे नवे दर जाहीर; मुंबई-पुणेसह आता राज्यभरात गॅस सिलेंडर किती रुपयांना?

Akshay SL: LIVE मॅचमध्ये अचानक छातीत कळ अन् कर्नाटकच्या माजी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू

Latest Jobs : काम न करता मिळणार 3.7 कोटी रुपये पगार? OpenAI ने आणली अशी नोकरी, जाणून मोठमोठ्या इंजीनियर्सचं डोकं चक्रावलय

सरकारी रुग्णालयात खासगी लॅबचा सुळसुळाट; कमिशनखोर प्रशासनाचा वरदहस्त, रुग्णांची लूट

Nashik: गुरुजींना ५ लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य संरक्षण, वैद्यकीय बिले प्रतिपूर्ती बंद; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT