पिंपरी-चिंचवड

श्रावस्ती बुद्ध विहारामार्फत धम्मयात्रा सहल उत्साहात

CD

पिंपळे गुरव, ता. १५ ः श्रावस्ती बुद्ध विहाराच्यावतीने पवित्र वर्षावासानिमित्ताने जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी येथे एक दिवसीय धम्मयात्रा सहलीचे आयोजन करण्यात आले. ही सहल अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहात पार पडली. सहलीत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक भाविकांनी सहभाग घेतला.
विहाराचे संस्थापक व अध्यक्ष कैलास बनसोडे यांच्या पुढाकाराने ही सहल आयोजित करण्यात आली.
या यात्रेचा मुख्य उद्देश बौद्ध संस्कृतीचा गौरव, इतिहासाचे दर्शन आणि नव्या पिढीत धम्मविषयक जाणीवा जागविणे हा होता. अजिंठा लेणीतील बुद्ध चरित्रावर आधारित भित्तिचित्रे, प्राचीन शिल्पकला आणि बौद्ध स्थापत्यशैली पाहून उपस्थित भाविक भारावून गेले. यात्रेदरम्यान त्रिशरणपाठ, बुद्धवंदना, सामूहिक ध्यान आणि मार्गदर्शकांच्या साहाय्याने लेण्यांचा ऐतिहासिक व धार्मिक अभ्यासही करण्यात आला. शांत, सात्त्विक वातावरणात सहलीचा अनुभव आध्यात्मिक उन्नती देणारा ठरला. श्रावस्ती बुद्ध विहारचे कार्यकर्ते, सदस्य व भाविकांनी उत्कृष्ट संयोजन करून या उपक्रमात आपले योगदान दिले.
PMG25B02597

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

SCROLL FOR NEXT