पिंपरी-चिंचवड

समाजप्रबोधन अन् आकर्षक देखाव्यांची परंपरा

CD

पिंपळे गुरव, ता. ३१ ः कासारवाडी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा समाजप्रबोधन आणि आकर्षक देखाव्यांची परंपरा जपली आहे. काही मंडळांनी सजावटीपेक्षा सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य दिले असून, नाट्य, नृत्य व गाण्यांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक संदेश पोहोचवला आहे. काही मंडळांनी विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करून देखावे सादर केले आहेत. मनोरंजनासह समाजोपयोगी उपक्रमांवरही मंडळांचा भर आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, पर्यावरण आणि स्वच्छतेचे अभियान अशा विविध उपक्रमांद्वारे सामाजिक बांधीलकी जोपासली जात आहे.

- शिवस्पर्श प्रतिष्ठानच्या शितळादेवी मित्र मंडळाने यावर्षी गणरायाच्या स्वागतासाठी फुलांची आरास साकारली आहे. गणराय रंगीबेरंगी, विशेषतः पांढरी व गुलाबी फुलांची तटबंदी आणि तिरकस छत यामध्ये विराजमान झाले आहेत.
- सुवर्ण पिंपळ मित्र मंडळाने रंगीबेरंगी सजावटीत मध्यभागी सुंदर, आकर्षक गणपतीची मूर्ती विराजमान आहे. श्री गणेशाचे स्वरूप अत्यंत दिव्य आणि मंगलकारी भासते.
- जय हिंद तरुण मंडळ, कासारवाडीचा राजा यांनी यावर्षीची थीम जंगलावर आधारित आहे. संपूर्ण सजावटीतून नैसर्गिक हिरवाई, झाडांच्या वेलींनी व्यापलेला जंगलाचा देखावा उभा केला आहे. मध्यभागी आकर्षक आणि भव्य अशी गणपतीची मूर्ती आहे. या मंडळाला ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
- जाणता राजा ग्रुपने साकारलेल्या या देखाव्यात सुंदर सजावट केलेल्या मंडपात आकर्षक गणेशमूर्ती विराजमान आहे. फुलांच्या मनमोहक आरासाने सजवलेला पार्श्वभूमीचा हिरवा गालिचा, लाल-पांढऱ्या फुलांच्या चौकटी तसेच झुंबर व तोरणांनी सजलेला रंगीत शृंगार वातावरण अधिक भक्तिमय करते.
- श्रीकृष्ण मित्र मंडळाने गणेशोत्सवासाठी सजवलेला हा देखावा मनाला प्रसन्न करणारा आहे. आकर्षक मांडवामध्ये उभ्या केलेल्या रंगीबेरंगी सजावटीत गणेशाची भव्य मूर्ती प्रतिष्ठापित केलेली दिसते.
- नवनाथ मित्र मंडळ, दत्त प्रतिष्ठान कासारवाडी यांनी साकारलेला भाविकतेने ओतप्रोत असा देखावा दिसतो. मध्यभागी स्वामी समर्थ महाराजांची भव्य मूर्ती स्थापन केलेली आहे. समोर शुभ्र वस्त्र परिधान केलेली व हार-फुलांनी सजलेली श्री गणेशाची मूर्ती विराजमान आहे.
- श्री गणेश मित्र मंडळ, शास्त्रीनगरचा राजा यांचा भव्य आणि आकर्षक देखावा दिसत आहे. लाल गालिच्यावर उभारलेले सुंदर मंडप, त्यामध्ये सजवलेले गडद राखाडी रंगाचे मंदिरसदृश्य मंडप आणि त्यामध्ये विराजमान असलेले गणराय या देखाव्याला अधिकच दिव्य बनवतो.
- अभिनव मित्र मंडळाने सजविलेला हा देखावा आकर्षक आणि भक्तिभाव जागवणारा आहे. विठोबाच्या प्रतिमा व ‘पांडुरंग’ असे लिहिलेले फलक लावून धार्मिक वातावरण साकारले आहे.
- जय महाराष्ट्र व्यायाम मंडळ (ट्रस्ट) यांच्या स्थापनेला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त, मंडळाने गणेश मंडपाची आकर्षक सजावट केली आहे. मंडपात भव्य दरवाजाच्या आकाराची रचना उभारण्यात आली असून, त्यावर भगवान श्रीकृष्णाचा मोहक देखावा साकारण्यात आला आहे. श्रीकृष्णाच्या हातातील बासरी, डोक्यावरचे मोरपीस आणि चेहऱ्यावरचा शांत, प्रसन्न भाव सजावटीचे आकर्षण ठरत आहे.
- एकदंत मित्र मंडळाने सुंदर देखावा प्रकाशयोजनेसह साकारलेला आहे. मध्यभागी सुवर्ण अलंकारांनी सजवलेली गणरायाची आकर्षक मूर्ती विराजमान आहे. श्री गणेशाच्या मागे डोंगराच्या आकारातील शिवशंकराचे प्रतीक व त्रिशुळाची आकृती उजळून निघाली आहे.
- महागणपती प्रतिष्ठानने देखावा आकर्षक पद्धतीने उभारलेला दिसतो. संपूर्ण मंडप रंगीबेरंगी इलेक्ट्रिक लाइट्सने सजविला असून, त्यावर सुंदर कोरीवकामासारखा नजारा उभारलेला आहे. वरच्या भागात भगवान श्रीराम आणि माता सीतेचे तेजस्वी दर्शन लाइट्सच्या माध्यमातून दाखविले आहे. मध्यभागी गणपतीची मूर्ती विराजमान असून, आजूबाजूला विविध रंगीबेरंगी प्रकाशझोतांनी वातावरण उजळले आहे.
- कुंदननगर मित्र मंडळाचा देखावा महलाच्या स्वरूपात साकारला आहे. भव्य आणि आकर्षक सजावटीमध्ये श्री गणरायाची तेजोमय मूर्ती विराजमान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंना मुंबई सोडावी लागणार? पोलिसांनी पाठवली नोटीस, कोर्टात दुपारी महत्त्वाची सुनावणी

OBC Reservation: उद्यापासून ओबीसी संघटनांचे ‘इशारा आंदोलन’; आरक्षणाच्या संरक्षणासाठी नागपूर विभागात आंदोलन होणार

Pune Road Accident : पुण्यात भीषण अपघात; सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच मृत्यू; अंगावरून चाक गेलं अन्...

Nestle CEO: ऑफिसमध्ये CEOचे ज्युनियर सोबत अफेअर; मोजावी लागली मोठी किंमत, 913 कोटींची नोकरी गमावली

भूस्खलनात अख्खं गाव गाडलं गेलं, किमान १ हजार जणांचा मृत्यू, एकटाच वाचला; वेस्टर्न सुदानमधील घटना

SCROLL FOR NEXT