पिंपरी-चिंचवड

पौराणिक देखावे, मंदिरांच्या प्रतिकृती अन् सामाजिक भानही

CD

पिंपळे सौदागर, ता. ३१ ः पिंपळे सौदागर परिसरात विविध गणेश मंडळांनी पौराणिक, सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले आहेत; तर अनेक मंडळांनी मंदिरांच्या प्रतिकृती साकारल्या असून सामाजिक भान राखत अन्नदान, रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली आहेत.

बालाजी मंदिराची प्रतिकृती
पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौक मित्र मंडळाने बालाजी मंदिराची अप्रतिम प्रतिकृती उभारली आहे. सोन्याच्या रंगातील सुंदर कोरीव स्तंभ, घुमट व शिखर यामुळे मंदिराला देदीप्यमान रूप प्राप्त झाले आहे. मंडळाचे यंदाचे दुसरे वर्ष असून अंकुश कुंजीर हे अध्यक्ष आहेत.

सुवर्ण कलाकुसरीचा मंडप
अखिल विश्वशांती कॉलनी परिसरातील विश्वशांती प्रतिष्ठानने सुवर्ण कलाकुसरीने सजविलेला मंडप साकारला आहे. प्रतिष्ठानतर्फे वर्षभरात अनेक उपक्रम राबवले जातात. मंडळाचे यंदाचे २६ वे वर्ष असून मयूर काटे हे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.

पौराणिक मंदिर
काटे वस्ती येथे छत्रपती युवा मंचाने यंदा १३ व्या वर्षी पौराणिक मंदिराचा देखावा सादर केला आहे. भव्य मंडप, कलात्मक कोरीव कामाची सजावट, आकर्षक प्रकाश योजना आणि प्रवेशद्वारावरील हत्तींच्या आकर्षक मूर्ती आहेत. योगीराज काटे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

विविध सामाजिक उपक्रम
केशवनगर येथील सौदागरचा राजा मित्र मंडळाने ३५ व्या वर्षानिमित्ताने मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संजय काटे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

मंत्रोच्चार पठण
काटे वस्ती रस्त्यावरील साई मित्र मंडळाने मंत्रोच्चार पठणाचा देखावा आकर्षक पद्धतीने साकारण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष तुषार काटे, श्रेयश काटे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ यंदा ११ वे वर्ष साजरे करत आहे.

शिश महालाचा मंडप
क्रांती क्रीडा मंडळाने २५ व्या वर्षी शिश महालाच्या धर्तीवर मंडपाची रचना साकारली आहे. सूक्ष्म नक्षीकाम, फुलांची रंगीबेरंगी सजावट आणि झुंबरांनी सजलेले दरबारसदृश्य वातावरण यामुळे संपूर्ण परिसर राजेशाही भासतो. मंडळाचे अध्यक्ष धीरज काटे हे आहेत.

भाविकांना अन्नदान
क्रांती मित्र मंडळाने गणेश मूर्तीला चांदीचे विविध दागिने परिधान करण्यात आलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाकडून दहा दिवसांच्या उत्सव काळात सुमारे एक हजार भाविकांना अन्नदानाची सेवा दिली जाते.

केदारनाथ मंदिर
कोकणे चौक मित्र मंडळाचे यंदाचे १३ वे वर्ष असून मंडळाने केदारनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे. हिमालयातील केदारनाथ धामाचा अप्रतिम अनुभव देणाऱ्या या सजावटीत मंदिराची भव्यता, दिव्यतेसह शांत आणि भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात आले आहे. उल्हास कोकणे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

द्वारका श्रीकृष्ण महाल
पिंपळे सौदागर गावठाणातील जय महाराष्ट्र मित्र मंडळाने यंदा ४५ फुटी भव्य द्वारका श्रीकृष्ण महालाचा देखावा उभारण्यात आला आहे. सुंदर शिल्पकला, भव्य दरबार, श्रीकृष्णाचे राजस स्वरूप आणि प्रकाशमय सजावट यामुळे हा देखावा भक्तांचे मन वेधून घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : परवानगी नाही... मुंबई खाली करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर येऊन खात्री करु... मुंबई हायकोर्टाचं परखड मत

Manoj Jarange: आमचा वाघ चार दिवसांपासून उपाशी, मग आम्ही सण का साजरा करायचा? महिलांचा महालक्ष्मीला भावनिक निरोप

Madhuri Elephant : ‘माधुरी हत्ती’ मठात परत येणे अशक्य? पुन्हा आंदोलन करण्याचा राजू शेट्टींचा इशारा

Vikramaditya Vedic Clock : भारतीय परंपरेला उजाळा! विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे अनावरण, हे कसे काम करणार?

अलिबागमधील प्रकरणावरून शाहरुखची लेक गोत्यात ! शेतकरी म्हणून ओळख दाखवणं पडलं महागात ?

SCROLL FOR NEXT