पिंपळे सौदागर, ता. १ : क्लासेसमध्ये प्रिंटरमुळे आग लागली. ही आग आणखी भडकली. या वर्गात अडकलेले ४२ विद्यार्थी आणि सहा कामगारांची सुटका करण्यात आली. ही घटना पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन मार्गावरील ओम दत्त मंदिरासमोरील प्राइम स्क्वेअर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर घडली.
सदर इमारत व्यावसायिक असून तिला फक्त एक लिफ्ट आणि एक जिना आहे. त्यामुळे अग्निशमन दलाला मदतकार्यात अडचणी आल्या. अग्निशमन दलातील ऋषिकेश चिपडे, गौतम इंगवले, विनायक नाळे, मयुर कुंभार व दत्तात्रय रोकडे यांनी अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. यावेळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या मदतकार्यात होत्या. या इमारतीत सर्वत्र धूर पसरल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. दरम्यान, या आगीत संगणक, मोबाइल, कॅमेरा, टेबल, पुस्तके, हार्ड डिस्क, टेलिफोन, पेपर सेट इत्यादी नष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस आणि अग्निशमन दल घटनेचे मूळ कारण तपासत असून इमारतीतील सुरक्षा उपाय सुधारण्यासाठी पुढील पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आग लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.