पिंपरी-चिंचवड

पिंपळे सौदागरच्या पीएमपी थांब्यावर बेकायदा पार्किंग

CD

पिंपळे सौदागर, ता. ३ ः पिंपळे सौदागर - काळेवाडी - रहाटणी रस्त्यावर महादेव मंदिरासमोरील पीएमपी बसथांबा सध्या खासगी दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अतिक्रमणांमुळे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. या चौकातील बसथांबा कायमच वाहनांच्या विळख्यात अडकलेला दिसून येत असून त्यामुळे रोज प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
या बसथांब्याच्या अवघ्या पन्नास मीटर अंतरावर पिंपरीकडे जाणारा पूल असल्याने हा रस्ता नेहमीच अत्यंत वर्दळीचा असतो. अशा परिस्थितीत अनेक वेळा खासगी दुचाकी व चारचाकी वाहने थेट बसथांब्यासमोर उभी केली जातात. काहीवेळा चारचाकी वाहने भररस्त्यातच उभी राहत असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होतो.
बस थांबताच प्रवाशांना बस पकडण्यासाठी रस्त्यावरून धाव घ्यावी लागत असून यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. परिसरातील दुकानांमध्ये खरेदीसाठी आलेले नागरिक तसेच महादेव मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक विचार न करता बसथांब्यावरच वाहने उभी करतात. परिणामी, पीएमपी चालकांना बस थांब्यापासून दूर उभी करावी लागते. त्यामुळे प्रवाशांना बसच्या मागे धावत जावे लागते आणि अनेकदा छोटे-मोठे अपघात घडत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. बसथांबा मोकळा ठेवून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

काय करता येईल ?
बसथांब्यावर स्पष्ट रेषांकन, सूचना फलक लावणे
वाहतूक पोलिस किंवा ट्रॅफिक वॉर्डनची नियमित नेमणूक
सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देखरेख वाढवणे
खासगी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था
नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
बसथांब्याची नियमित तपासणी


दुचाकी, चारचाकी वाहनांकडून बसथांबा किंवा रस्त्यावर अडथळा निर्माण करताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- सुदाम पाचोरकर, पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक शाखा

दररोज या बसथांब्यावरून प्रवास करतो. बस थांब्याजवळ दुचाकी, चारचाकी वाहने उभी असतात. त्यामुळे, बस रस्त्यावरच थांबते. बस पकडण्यासाठी रस्त्यात उतरावे लागते आणि भरधाव वाहनांमुळे जीव मुठीत घेऊन चालावे लागते. प्रशासनाने येथे कायमस्वरूपी कारवाई करून बसथांबा मोकळा ठेवावा.
- विकास मोरे, प्रवासी

PMG26B03008

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: काकाच्या हत्येचा बदला? नमाजानंतर चाकूहल्ला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल ठार, जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट!

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

भाविकांसाठी बातमी! विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन तीन दिवस राहणार बंद; मूर्तीवर लवकरच हाेणार रासायनिक प्रक्रिया..

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

Solapur Crime:'अक्कलकोटच्या व्यापाऱ्यास १५ लाख रुपयांना गंडवलं; ब्रोकरमार्फत मुंबईहून मागवलेले खाद्यतेल आलेच नाही!

SCROLL FOR NEXT