पिंपरी-चिंचवड

आमदार जगताप यांच्याकडून जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती

CD

सकाळ इम्पॅक्ट

पिंपळे गुरव, ता. ४ ः जिल्हा रुग्णालयाचे शवागारच ‘मृत्युशय्येवर’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये बुधवारी (ता.४) प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची तातडीने दखल घेत चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी जिल्हा रुग्णालयाला सकाळी अचानक भेट दिली. तसेच रुग्णालयातील विदारक परिस्थिती पाहून प्रशासनाची झाडाझडती घेतली.
रुग्णालयात जगताप यांना ठिकठिकाणी अस्वच्छता, मोडकळीस आलेली आसन व्यवस्था, सांडपाणी, घाण पसरलेली दिसून आली. डॉक्टरांची उपस्थिती नियमाप्रमाणे नसून मनुष्यबळाची तीव्र कमतरता असल्याचे निदर्शनास आले. सौर उर्जा यंत्रणा बसवूनही नेट मीटरिंग नसल्याने ती कार्यान्वित नसल्याचे स्पष्ट झाले. अनेकदा रुग्णांना डॉक्टर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी जगताप यांच्याकडे केल्या. रुग्णालयातील शवागार बंद असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.


पुणे, पिंपरी-चिंचवड व लगतच्या ग्रामीण भागातून जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे रुग्णांना तत्काळ व दर्जेदार उपचार मिळणे अपेक्षित आहे. जिल्हा रुग्णालयाबाबतच्या सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण सुमीत सोनवणे याच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेबाबत मुंबई अधिवेशनात राज्य शासनाचे लक्ष वेधणार आहे.
- शंकर जगताप, आमदार, चिंचवड

PMG26B03083

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: हरिश राणाच्या इच्छामरणासाठी १३ वर्षे का लागली? कायदा, कोर्ट आणि वेदनेची पूर्ण कहाणी; ही पहिलीच केस नाही तर…

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

SCROLL FOR NEXT