पिंपरी-चिंचवड

अखेर १३० मोबाईल मूळ मालकांना परत

CD

पिंपळे गुरव, ता. ७ ः सांगवी परिसरात हरविलेले व चोरीस गेलेले तब्बल १३० मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांना परत करण्याची उल्लेखनीय कामगिरी सांगवी पोलिसांनी केली आहे. केंद्र सरकारच्या सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून ही कार्यवाही करण्यात आली. चार वर्षांनंतर मोबाईल परत मिळाल्याने अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून आला.
हरविलेल्या मोबाईलची तक्रार दाखल होताच पोलिसांनी सीईआयआर पोर्टलवर नोंद करून मोबाईलचा मागोवा घेण्याची प्रक्रिया सुरू केली. या तपासातून विविध ठिकाणी असलेले गहाळ व चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. काही मोबाईल वीस दिवसांपूर्वी हरवलेले होते, तर काही तब्बल चार वर्षांपूर्वीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या मोहिमेत सापडलेल्या मोबाईलपैकी पहिल्या टप्प्यातील ५० मोबाईलचे वितरण सांगवी पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आले. सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे यांच्या हस्ते नागरिकांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले. यावेळी सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलिस हवालदार राजाराम माने उपस्थित होते.


हरवलेले मोबाईलची तक्रार दाखल होताच. केंद्र सरकारच्या सीईआयआर पोर्टलद्वारे मोबाईल मिळविण्यासाठी चौकशी करण्यात आली. गहाळ मोबाईल व चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. वीस दिवस ते अगदी मागील चार वर्षांपर्यंतचे मोबाईल मिळवण्यात यश आले आहे.
- सचिन हिरे, सहाय्यक पोलिस आयुक्त

चार वर्षांपूर्वी माझा रेडमी मोबाईल हरविला होता. तो परत मिळेल अशी अपेक्षाच नव्हती. आज अचानक सांगवी पोलिसांकडून मोबाईल मिळाल्याने खूप आनंद झाला. योगायोगाने आजच माझा वाढदिवस आहे. मी संध्याकाळी नवीन मोबाईल घेणार होते, पण जुना मोबाईल परत मिळाल्याने हा वाढदिवस माझ्यासाठी खास ठरला.
- दीपा अगरवाल, पिंपळे गुरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli News: स्कूटीवरून दोन तरूण आले, कारवर पेट्रोल टाकून आग लावली अन्...; डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

Jalgaon News : कर्जमाफीचा शब्द पाळला! पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून स्वागत, तर खडसेंकडून सरकारवर टीकास्त्र

Accident: मालगाडीचा मोठा अपघात! रुळ उखडले अन् चाकेही वेगळी झाली; रेल्वेचे ७ ते ८ डब्बे रुळावरून घसरले

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

मालिकाविश्वात 'या' अभिनेत्याचा दमदार कमबॅक ! आनंदी मालिकेत दिसणार वयाने मोठा नवरा आणि तरुण बायकोची कथा ?

SCROLL FOR NEXT