पिंपरी-चिंचवड

अशोक कामटे उद्यानात भटक्या श्वानांचा उपद्रव

CD

पिंपळे गुरव, ता. १६ ः पिंपळे निलख येथील शहीद अशोक कामटे उद्यानात भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. श्वानांच्या झुंडी फिरत असल्याने येथे सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी येणारे नागरिक, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घटनाही घडल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे.
उद्यानात नियमितपणे फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक भटके श्वान कायमस्वरूपी थांबलेले असतात. काही श्वानप्रेमींकडून त्यांना नियमितपणे खाऊ घातला जात असल्याने श्वानांची संख्या वाढत असून ते येथेच झुंडीने बसलेले किंवा फिरताना दिसतात. त्यामुळे कधी कधी श्वान आक्रमक होऊन नागरिकांचा पाठलाग करतात किंवा भुंकत धाव घेतात.
या श्वानांनी काही नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. प्राण्यांप्रती संवेदना ठेवणे योग्य असले तरी नागरिकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिले पाहिजे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. उद्यानात खेळण्यासाठी येणारी लहान मुले, व्यायामासाठी येणारे युवक तसेच फेरफटका मारणारे ज्येष्ठ नागरिक यांना या परिस्थितीमुळे सतत सावध राहावे लागत आहे.

काय करता येईल...
- भटके श्वान पकडून त्यांना निवारा केंद्रात सोडणे
- इच्छुक श्वानप्रेमींकडून त्यांना दत्तक घेण्यास मदत घेणे
- सार्वजनिक खाऊ घालण्याबाबत समज देणे
- श्वानांची संख्या नियंत्रित करणे


संबंधित उद्यानाची तातडीने पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. भटक्या श्वानांच्यासंदर्भात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
- महेश गारगोटे, उद्यान अधीक्षक, पिंपरी चिंचवड महापालिका

‘डॉग स्कॉड’ पाठवून भटक्या श्वानांचे निरीक्षण केले जाईल. जे श्वान आक्रमक असतील. त्यांना उचलून रेबीजचे इंजेक्शन देता येईल. त्यामुळे त्यांची आक्रमकता कमी होईल. परंतु, त्यासाठी प्रथम निरीक्षण महत्वाचे आहे.
- डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT