पिंपळे गुरव, ता.१८ ः छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि गुढीपाडव्याच्या निमित्त दापोडी येथे ‘शिव सह्याद्री सहस्त्र’ या शिवकालीन वस्तूंच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. दापोडीतील गणेश मंदिराजवळ गणेशनगर परिसरात हे प्रदर्शन भरविण्यात आले.
या प्रदर्शनामागील उद्देश सर्वसामान्य नागरिक, विशेषतः तरुण पिढी आणि लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासकालीन शस्त्रसामग्री व वस्तूंचे प्रत्यक्ष दर्शन घडवणे हा होता. प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रदर्शनामध्ये तलवार, ढाल, दांडपट्टा, भाला, वाघनखे, बिचवा, विविध प्रकारच्या कट्यारी तसेच शिवकालीन युद्धसामग्रीचे अनेक नमुने पाहण्यासाठी ठेवण्यात आले. तसेच उपस्थितांना या सर्व वस्तूंची सविस्तर माहिती देण्यात आली.
ॲड. विनय दाभाडे यांच्या पुढाकारातून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी शहर सुधार समिती अध्यक्ष संजय काटे, स्वाती काटे, राजू भास्कर, पोलिस उपनिरीक्षक राहुल काटे, सनी खंडागळे, कालीचरण पाटोळे, संतोष काटे, तानाजी काटे आदी मान्यवर व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोजक राहुल काटे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.