पिंपरी-चिंचवड

भोसरी एमआयडीसीत उद्या उद्योजक मेळावा

CD

पिंपरी, ता. ८ : पिंपरी-चिंचवड महिला लघु उद्योजक संघटना आणि फोरम ऑफ र्स्माल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन यांचा संयुक्त विद्यमाने उद्योजिका आणि उद्योजक मेळावा शुक्रवारी (ता.१०) दुपारी चार वाजता भोसरी एमआयडीसीतील टी ब्लॉक-भूखंड क्रमांक ९७, भोर इंडस्ट्रिअल कॉम्पलेक्स येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महाराष्ट्र उद्योगमंत्री उदय सामंत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महिला लघु उद्योजक संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी दिली.
या प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी, महावितरण व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. महिलांना विशेष करून महिला उद्योग निर्मितीसाठी चालना देण्यासाठी विविध विषयावर मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुढील काळात महिला लघुउद्योजक संघटनेसाठी महिला उद्योगांची उभारणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणारआहे, असे दुर्गा भोर यांनी सांगितले.

समस्या सोडविण्याचे साकडे
दुर्गा भोर यांनी उद्योगमंत्री सामंत यांना शहरातील महिला उद्योजकांच्या प्रश्‍नांसंदर्भात दुर्गा भोर यांनी भेटून निवेदन दिले होते. त्यावेळी महिला उद्योजकांसाठी जागा तसेच महिला उद्योगांना उद्योग व्यवसायासाठी येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली होती. शहरात औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. परंतु शहरांत महिलांच्या उद्योगासाठी कोणतीही पायाभूत सुविधा अद्याप उभारण्यात आलेल्या नाहीत. शहरामध्ये महिला उद्योजक घडविण्यासाठी संघटना प्रयत्न करत आहे. परंतु महिलांना औद्योगिक परिसरामध्ये उद्योग करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महिलांना निर्यात क्षेत्रापासून आपण बनवलेल्या वस्तूंना देखील बाजारपेठ मिळत नाही. त्यामुळे महिला उद्योग क्षेत्रात पुढे येण्यासाठी धजावत नाहीत. सरकारने महिलांना उद्योग व्यवसायात आणण्यासाठी सरकारच्या योजना देऊन व स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारावे, निर्यात करण्यासाठी योजना द्याव्यात आणि सहकार्य करावे, असे साकडे त्यांना घालण्यात आले होते. त्यावेळी सामंत यांनी लवकरात लवकर यावर विचार करून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्‍वासन दिले होते, अशी माहिती भोर यांनी दिली.

‘‘महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण, निर्यात आणि येणाऱ्या आधुनिक काळातील उद्योगांविषयी देखील माहिती देण्यात येईल. शहरातील महिलांनी आणि उद्योजकांनी मेळाव्यास उपस्थित राहून उद्योग क्षेत्रात आपले योगदान द्यावे, यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रसंगी सरकारचे नवीन योजना व त्या संदर्भात देखील माहिती दिली जाईल.’’
- अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ र्स्माल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT