पिंपरी-चिंचवड

चिंचवडमध्ये ३३ उमेदवारांचे अर्ज वैध अवैध

CD

चिंचवडमध्ये ३३ उमेदवारांचे अर्ज वैध

पिंपरी, ता. ८ : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये मुदतीत ४० उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले होते. यापैकी ३३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, ७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. अर्ज अवैध ठरलेल्या ७ उमेदवारांमध्ये ‘आप’चे मनोहर पाटील यांचाही समावेश आहे. तर; भाजपच्या उमेदवार अश्‍विनी जगताप यांचा अर्ज वैध असल्याने बदली (डमी) उमेदवार शंकर जगताप यांचेही चार अर्ज अवैध ठरले आहेत.
उमेदवारांच्या अर्जांची आज (बुधवारी) छाननी प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी वैध आणि अवैध ठरलेल्या उमेदवारांची घोषणा केली. निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि पोलिस निरीक्षक अनिल यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये अपक्ष चेतन ढोरे, गणेश जोशी, उमेश म्हेत्रे, प्रकाश बालवडकर, संजय मागाडे, भाजपचे बदली उमेदवार शंकर जगताप, ‘आप’चे उमेदवार मनोहर पाटील यांचा समावेश आहे. तर; अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये भाजपच्या अश्‍विनी जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल ऊर्फ नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम, बहुजन मुक्ती पार्टीचे सतीश कांबिये, बहुजन भारत पार्टीचे तुषार लोंढे, महाराष्ट्र लोकहितवादी पार्टीचे प्रफुल्ल मोतिलिंग, आजाद समाज पार्टीचे (कांशीराम) मनोज खंडागळे आदी ३३ जणांचा समावेश आहे.

चौकट
‘आप’चा अर्ज अवैध
अर्ज छाननीत ‘आप’ला मोठा धक्का बसला. उमेदवार मनोहर पाटील यांच्या उमेदवारी अर्जात सूचक, अनुमोदक न दिल्याने अर्ज अवैध ठरला. अर्ज बाद झाल्यानंतर पक्षातील दोन गटात वाद होऊन, बाचाबाची झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, वेळ कमी असल्याने घाईगडबडीत उमेदवारी अर्ज भरल्याने त्यात चुका झाल्या. पक्षांतर्गत कसलेही वाद अथवा बाचाबाची झाली नाही, अशी माहिती ‘आप’चे शहर उपाध्यक्ष महेश पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT