पिंपरी-चिंचवड

वयाच्या ६३ व्यावर्षी बनल्या ‘कथक नृत्य विशारद'' मीनल उंब्राणी यांची प्रेरणादायी कहाणी ः अर्धांगवायूनंतरही स्वप्नं साकारले

CD

पिंपरी, ता. ८ ः वयाच्या पन्नाशीत त्यांना अर्धांगवायू झाला. हसते आयुष्य एका खुर्चीत मर्यादित झाले. वर्षभर उपचार सुरू राहिले. आजारपणावर मात केली अन् जिद्दीने उभ्या राहिल्या. मुलीलाच गुरू मानले आणि वयाच्या ६३ या वर्षी त्यांनी ‘कथक नृत्य विशारद'' ही पदवी मिळवली. ही प्रेरणादायी कहाणी आहे चिंचवडमधील मीनल उमेश उंब्राणी या आजीबाईंची.

‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ ही म्हण मीनल उंब्राणी यांनी सत्यात उतरवून दाखवली. लहानपणापासून डोळ्यात साठवलेले आणि मनात जपलेलं स्वप्न पूर्ण करण्याची सुरवातच मुळी वयाच्या पन्नासाव्या वर्षी अर्धांगवायूनंतर झाली. त्यानंतर डावा पाय कमजोर झाला होता. पायाच्या स्नायूंना ताकद मिळण्यासाठी मीनल यांनी कथक नृत्य शिकायला सुरवात केली. ही पदवी मिळविण्यासाठी त्यांनी मुलगी पायल हिला गुरू मानले. हा प्रवास किती अवघड आहे, हे मुलगी पायल गोखले जाणून आहेत. पण आईचा प्रवास माझ्याहून खूपच अवघड असल्याचे पायल सांगतात. एकतर अर्धांगवायू आणि तिचं वय या गोष्टींमुळे हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा आणि सुकर नक्कीच नव्हता. या प्रवासात त्या फक्त नृत्य शिकत नव्हत्या. तर मुलगी, बहीण, पत्नी, सून, आई, सासू, आजी, विहिण, मैत्रीण, शिक्षिका अशा अनेक जबाबदाऱ्या तेवढ्याच ताकदीने आणि उत्साहाने पार पाडत होत्या. त्यांनी प्रारंभिक, प्रवेशिका आणि प्रवेशिका पूर्ण अशा तीन परीक्षा दिल्या. आजारपणावर मात करत तिने आपली नृत्यकला जोपासली. ही पदवी मिळवण्याबद्दल घरच्यांसह तिनं आपल्या गुरूंचे आभार मानले आहेत.

एक गुरू म्हणून कथक नृत्यांगना पायल म्हणाल्या,‘‘माझ्याकडे नृत्य शिकायचे म्हणून कितीतरी महिला येतात. पण प्रत्येक वेळी वयाचा बहाणा करतात. नृत्य शिकू शकते का? अशी शंका उपस्थित करतात. त्यावेळेस मी आईचे उदाहरण त्यांना देते. कारण नृत्य शिकायला सुरवात करणाऱ्या बऱ्याच असतात पण त्या शेवटपर्यंत जात नाहीत. अनेक कारणे असतील, पण त्या २-३ परीक्षेनंतरच ‘नृत्य करणे शक्य होत नाही, असं सांगतात आणि नृत्य बंद करतात पण माझ्या आईने अशक्य गोष्ट करून दाखवली. आईने वयाच्या ६३ व्या वर्षी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या कथक नृत्य विशारद या परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त केलेली आहे.

कोट
नृत्य शिकण्याची लहानपणापासूनची इच्छा होती. आज १३ वर्षांनी मी या यशापर्यंत पोचलेली आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी कथक नृत्य विशारद ही पदवी प्रथम श्रेणीत संपादन केलेली आहे. याचे सर्व श्रेय माझ्या कुटुंबीयांना देते.
-मीनल उंब्राणी, कथक विशारद, चिंचवड

फोटो ः 23489

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT