पिंपरी-चिंचवड

तुम्ही अजूनही आमच्यातच आहात ः अश्र्विनी जगताप लक्ष्मण जगताप यांना जन्मदिनानिमित्त अभिवादन

CD

पिंपरी, ता. १५ : ‘‘तुमच्या नावापुढे आजही स्वर्गीय, दिवंगत असे शब्द लावताना काळीज जड होते. तुम्ही, तुमचे कार्य, तुमचा संघर्ष आणि तुमचे विचार आजही आमच्या अवतीभवती आहेत. तुम्ही पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी केलेले काम कधीही विसरता येणार नाही. तुम्ही अजूनही आमच्यातच आहात.’’ अशा शब्दांत अश्‍विनी लक्ष्मण जगताप यांनी त्यांचे पती, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना जन्मदिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले.
पिंपरी-चिंचवडचे लोकनेते लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. १५ फेब्रुवारी हा दिवस त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त बुधवारी त्यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून पिंपळे गुरव येथील स्मृतीस्थळावर जाऊन दिवंगत लक्ष्मण जगताप यांना अभिवादन केले. संपूर्ण जगताप कुटुंबानेही स्मृतीस्थळावर जात त्यांना अभिवादन केले. सध्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक सुरू आहे. भाजपने अश्‍विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. पतीच्या निधनाला ५० दिवसही पूर्ण झालेले नसताना अश्‍विनी जगताप दुःख बाजूला सारून निवडणूक लढवत आहेत.
बुधवारी सकाळी अश्‍विनी जगताप पतीच्या स्मृतीस्थळावर गेल्या. तेथे डोके टेकवून त्यांनी आपल्या अश्रूला मोकळी वाट करून दिली.

‘‘माझे पती दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी केलेले काम कधीही विसरता येणार नाही. ते अजूनही आमच्यातच आहेत. त्याच प्रेरणेतून मी दीनदुबळ्यांची, वंचितांची, गरजूंची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
- अश्‍विनी लक्ष्मण जगताप, भाजप उमेदवार, चिंचवड मतदारसंघ
फोटोः 24990

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT