पिंपरी, ता. १७ ः एच. ए. स्कूल प्राथमिक विभागांच्या विद्यार्थ्यांनी गोव्यातील नॅशनल थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये यश मिळवले. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव व शाळा समिती अध्यक्ष खेमराज रणपिसे, ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे, कराटे शिक्षक किरण माने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भिकाजी पाटील उपस्थित होते.
सुवर्णपदकाचे मानकरी - आयुष घाडीगावकर, मृणाली शिंदे, अथहर शेख, विद्या लक्ष्मी अग्रेसर, पूर्वा माने, कार्तिक देशमुख, स्नेहा भोई
रौप्य पदकाचे मानकरी - गिरीश पाटील, कृष्णा भोसले, सूरज सकट, दूर्वा माने, प्रीती पिरंगुडे, सोनेश्वर राऊत.
कांस्यपदकाचे मानकरी - कायनात शेख, लोकेश कांबळे, पार्थ चोपदार, रिद्धी वाळुंज.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.