पिंपरी-चिंचवड

मोटार चालकाकडून महिलेचे अपहरण

CD

पिंपरी, ता. १६ : उबेर अ‍ॅपद्वारे बुक केलेल्या मोटारीतून जात असलेल्या महिलेचे अपहरण केले. चालकाने भरधाव मोटार चालवून दोन ते तीन वाहनांना धडक दिली. कोणीतरी मोटारीवर वीट, दगड फेकून मारल्याने काच फुटून महिला जखमी झाली. सिग्नलला मोटार थांबल्यानंतर महिलेने स्वत:ची सुटका करून घेतली. हा प्रकार बाणेर ते पुणे विद्यापीठ सर्कल यादरम्यान घडला.
योगेश लहानू नवाळे असे गुन्हा दाखल केलेल्या उबेर चालकाचे नाव आहे. महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या वानवडी येथे रहायला असून, एका कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहेत. हिंजवडी परिसरात एका मिटींगसाठी त्या आल्या होत्या. काम संपल्यानंतर उबेर अ‍ॅपद्वारे मोटार बुक केली. मात्र, बाणेर येथे मोटारीत बसल्यानंतर चालकाने मोटार चुकीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने जाब विचारला असता, त्याने मोटार भरधाव चालवण्यास सुरवात केली. फिर्यादीने आरडाओरडा केला. यावेळी भरधाव मोटारीने दोन ते तीन वाहनांना धक्काही दिला. त्यानंतर मोटारीवर कोणीतरी वीट व दगड फेकून मारला. यामध्ये मोटारीची काच फुटल्याने फिर्यादी जखमी झाल्या. पुणे विद्यापीठ सर्कलजवळ सिग्नलला मोटार थांबल्यानंतर महिलेने स्वत:ची सुटका करून घेतली.
--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आता रेस्टॉरंटमध्ये बाटलीबंद पाणी खरेदीची सक्ती नाही; FDA कडून आदेश लागू, नवीन नियम नेमके काय आहेत?

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीला का नाही खेळवले? श्रेयस अय्यर बघा काय म्हणाला; आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत अन्...

रोज केस धुवू शकत नाही म्हणून... केसांसाठी 'हा' शॅम्पू वापरते प्राजक्ता गायकवाड; स्वतः सांगितलं नाव आणि उपयोग

Mahanagar Gas Limited: 90 दिवसांत PNG घ्या, नाहीतर LPG बंद! मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण झाले का? श्रेयस अय्यरच्या निर्णयाने सारे चकीत... पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT