पिंपरी-चिंचवड

थेरगावातील सखी मतदान केंद्र ठरले आकर्षक

CD

थेरगाव ः येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेतील ‘सखी मतदान’ केंद्र महिलांच्या दिमतीला सज्ज ठेवले होते. गुलाबी रंगसंगतीच्या रचनेतील मतदान केंद्रांचे संपूर्ण कामकाज महिला अधिकारी व कर्मचारी यांनी सांभाळले. येथे महिला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागा संबंधातील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र क्रमांक १९५ ‘सखी मतदान केंद्र’ एकमेव केंद्र तयार केले होते. गुलाबी रंगसंगतीमध्ये सजावट व फुलांची स्वागत कमान उभारली होती. रेड कार्पेट, आकर्षक मॅट, फुग्यांनी खोली सजविण्यात आली. टेबल व खुर्च्यांवर पांढरे व गुलाबी कापड होते. केंद्राच्या प्रवेशद्वारावर रांगोळी, फुलांचे तोरण होते. महिला मतदारांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. रांगोळीच्या पायघड्यांमुळे इतर केंद्रांपेक्षा सखी केंद्र आकर्षक ठरले.

महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. जयश्री बागे (केंद्रप्रमुख), अश्‍विनी ढेंबरे, मनीषा चिंचकर, विद्या कराळे (निवडणूक कर्मचारी), जयश्री पवार (शिपाई) आणि माधुरी उगले (पोलिस) यांनी केंद्राची जबाबदारी सांभाळली. निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी केंद्रास भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT