पिंपरी-चिंचवड

मुलाने केला वडिलांचा खून

CD

पिंपरी, ता. ८ : प्रेयसीबद्दल वाईट शब्द उच्चारल्याचा राग मनात मुलानेच वडिलांचा गळा आवळून खून केला. दुसऱ्या मुलाने गळफास घेतल्याचा बनाव रचला तर मृताच्या पत्नीने पुरावा नष्ट केला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. ही घटना दिघी येथे घडली.
अशोक रामदास जाधव (वय ४५, रा. समर्थ सदन इमारत दुसरा मजला, दिघी, मूळ- श्रीगोंदा, अहमदनगर) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी अशोक यांचा मोठा मुलगा राहुल अशोक जाधव (वय २५) व लहान मुलगा अनिल अशोक जाधव (वय २३) व अशोक यांच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्या तरुणीबाबत त्याचे वडील अशोक यांनी वाईट शब्द उच्चारले. याचा राग आल्याने अनिलने घरातील दोरीच्या साह्याने वडिलांचा गळा आवळून खून केला. त्यावेळी अशोक यांच्या नाकातोंडातून फरशीवर पडलेले रक्ताचे डाग त्यांच्या पत्नीने त्यांच्या अंगातील शर्टने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मोठा मुलगा राहुल याने घरातील दोरी फॅनला गुंडाळून अशोक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला.
खून केल्यानंतर फॅनला दोरी अडकवून वडिलांच्या गळ्यालाही दोरी गुंडाळली. पोलिसांनी चौकशी केली असता वडिलांनी गळफास घेतल्याचे सांगत दोरी कापून त्यांना खाली घेतल्याचे सांगितले. मात्र, घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली असता काही बाबी संशयास्पद आढळल्या. आरोपींकडे चौकशी केली असता ते देत असलेल्या माहितीतही विसंगती होती. शवविच्छेदनावेळीही शरीरावर जखमा आढळल्या.
यावरून पोलिसांनी आरोपींकडे सखोल चौकशी केली असता अखेर आरोपींनी खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी दिली.
दिघी पोलिसांनी तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता दहा मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अशोक हे मजुरीचे तर त्यांची दोन्ही मुले ट्रॅफिक वॉर्डनचे काम करायचे. तर अशोक यांची पत्नी गृहिणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT