पिंपरी-चिंचवड

कॅन्सर जनजागृतीसाठी तळेगावात रविवारी पिंकेथॉन रॅली

CD

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १५ ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कॅन्सर विरुद्ध लढा व प्रतिबंध जनजागृती करण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आणि टीजीएच ओंको लाइफ कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.१९) पिंकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी चित्रपट अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या हस्ते रॅलीचे उद्‍घाटन होणार असल्याचे सेंटरचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, प्रकल्प प्रमुख डॉ. धनश्री काळे (पोतदार), डॉ. मनोज तेजानी, क्लब अध्यक्ष दीपक फल्ले, डॉ. विद्या पोतले आदी उपस्थित होते. जास्तीत जास्त महिलांनी या जनजागृती रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी सरनाईक यांनी केले. प्रास्ताविक दीपक फल्ले यांनी केले. मारुती मंदिर चौक ते कॅन्सर सेंटर अशा तीन किलोमीटरच्या या उपक्रमात सुमारे ८१४ महिलांची नोंदणी केली असल्याचे सुनंदा वाघमारे यांनी सांगितले. विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'दुपारी १.११ वाजता बॉम्बस्फोट'... विधानभवनाला धमकीचा ई-मेल, सुरक्षा यंत्रणांची धावपळ

Ben Stokes Retirement Reason: ऑस्ट्रेलियात नेमकं काय घडलं? बेन स्टोक्सने निवृत्तीचं खरं कारण सांगितलं म्हणाला माझ्यात आता...

Nagpur Crime: प्रेयसीने बोलणे बंद केलं, प्रियकराने रचला कट; नागपुरात धक्कादायक प्रकार, एमडीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न अन्..

Latest Marathi News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार अन् पिकअपची धडक

Alandi Property Tax: आळंदीतील चतुर्थ वार्षिक करवाढीवर 748 हरकती; उद्या नगरपरिषदेत दिवसभर सुनावणी

SCROLL FOR NEXT