Electricity Theft
Electricity Theft Sakal
पिंपरी-चिंचवड

Mahavitran : आकुर्डीमध्ये आकडेबहाद्दरांना दणका; महावितरणकडून तब्बल चौदाशे वीजचोऱ्या उघड

सकाळ वृत्तसेवा

आकुर्डीमध्ये चिंचवड स्टेशनजवळील आनंदनगरमध्ये महावितरणने बुधवारी व गुरुवारी (ता. १५ व १६) धडक मोहीम राबवून सुमारे १४०० घरगुती वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत.

पिंपरी - आकुर्डीमध्ये चिंचवड स्टेशनजवळील आनंदनगरमध्ये महावितरणने बुधवारी व गुरुवारी (ता. १५ व १६) धडक मोहीम राबवून सुमारे १४०० घरगुती वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. महावितरणच्या शाखा अभियंता कृतिका भोसले व १७ सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. या मोहिमेत थेट तारांवर टाकलेले आकडेही जप्त करण्यात आले. यानंतर नवीन घरगुती वीजजोडणी घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची रीघ लागली आहे. तसेच या परिसरात वीजचोऱ्या होणार नाहीत, यासाठी येत्या १५ दिवसांमध्ये एरियल बंच केबल लावण्यात येणार आहे.

भोसरी विभागातील चिंचवड शाखेअंतर्गत आनंदनगर हा परिसर येतो. या ठिकाणी ३१५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्याची पाहणी करताना आकडे टाकून वीजचोऱ्या होत असल्याने अतिभारित झालेले रोहित्र नादुरुस्त झाल्याचे आढळून आले होते. महावितरणकडून लगेचच कारवाई करीत सर्व आकडे काढून टाकण्यात आले. त्यानंतर दहा दिवसांपूर्वी आनंदनगरमध्ये नवीन रोहित्र बसविण्यात आले. ते दोन दिवसांनी पुन्हा नादुरुस्त झाले.

यानंतर चिंचवड शाखेच्या सहायक अभियंता कृतिका भोसले तसेच आकुर्डी उपविभाग कार्यालयाचे सहायक अभियंता शीतल किनकर व अमित पाटील यांच्यासह १५ जनमित्रांनी बुधवारी (ता. १५) सकाळी दहाला आनंदनगरमध्ये वीजचोरीविरोधी पुन्हा विशेष मोहीम सुरु केली. त्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना वीजचोरीचे परिणाम समजून सांगण्यात आले व अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले. गुरुवारी (ता. १६) या मोहिमेला सकाळी अकराच्या सुमारास विरोध वाढल्यामुळे पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले. या दोन दिवसीय कारवाईमध्ये थेट आकडे टाकून तसेच इतर मार्गाने सुरु असलेल्या सुमारे १४०० घरगुती वीजचोऱ्या उघड करण्यात आल्या व वीजचोरीसाठी वापरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले.

महावितरणकडून आनंदनगर परिसरातील वीजचोरीविरोधी कामगिरीबाबत मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सहायक अभियंता कृतिका भोसले यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचे व सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले. या मोहिमेला भोसरीचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता उमेश कवडे यांनीही सहकार्य केले. मुख्य अभियंता पवार यांनी आनंदनगर परिसरात पुन्हा वीजचोऱ्या होऊ नयेत यासाठी एरियल बंच केबलचा वापर करण्याची सूचना दिली व त्याचा आराखडा त्वरित तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या १५ दिवसांत एरियल बंच केबल लावण्यात येणार आहे.

दरम्यान, या मोहिमे दरम्यान महावितरणकडून वीजमीटर काढून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही वीजचोरी होत असल्याचे दिसून आले. तसेच काहींनी थेट आकडे टाकून वीजचोरी केल्याचे आढळून आले. या सर्वांना अधिकृत नवीन घरगुती वीजजोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन वीजजोडणी घेण्यासाठी आतापर्यंत थकबाकीपोटी सुमारे ६० हजार रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. तसेच नवीन वीजजोडणीची मागणीही वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT