पिंपरी-चिंचवड

‘लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या चिंचवड स्थानकात थांबा द्या’

CD

पिंपरी, ता. १९ : पुढील काही महिने हे सुटीच्या कालावधीचे असून मोठ्या प्रमाणावर प्रवासी लांब पल्ल्याचा प्रवास करणार आहेत. मुंबई येथून सुटणाऱ्या व मुंबईकडे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यांना चिंचवड स्थानकात थांबा देण्यात येऊन प्रवाशांसाठी एक चांगली सुविधा तत्काळ उपस्थित करून देण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्यांनी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांच्याकडे केली.
पुणे ते लोणावळा हे अंतर जवळपास ६५ किलोमीटर असून, या दोन स्थानकाच्या दरम्यान लांब पल्ल्यांच्या गाड्या कुठेही थांबत नाहीत. पुणे ते लोणावळा दरम्यानचे मध्यवर्ती स्टेशन म्हणून आपण चिंचवड स्थानकाच्या विचार केल्यास येथे किमान ४० लाखांच्या आसपास नागरिक राहत आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग राहतो आहे. यातील बहुतांश कामगार वर्ग हा परराज्यातील असून त्यांना आपल्या गावी परत जाण्यासाठी किंवा परत येण्यासाठी दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून मोठ्या प्रमाणावर प्रवास करीत आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्या पकडण्यासाठी त्यांना पुणे किवा लोणावळा स्थानकात जावे लागते, असे केंद्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य बशीर सुतार व त्यांच्या सहकारी सदस्यांनी दुबे यांना भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘तुमच्या निवेदनाचा विचार करून नागरिकांच्या सोयीसाठी जे काय चांगले करता येईल ते आम्ही करू,’ असे आश्‍वासन दुबे यांना देण्यात आले. उप सरव्यवस्थापक मिलिंद हिरवे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT