पिंपरी-चिंचवड

व्यावसायिकाकडून खंडणी उकळणारा तळवडेत अटक

CD

पिंपरी : तू व्यवसायातून खूप पैसे कमावले आहेत, मी इथला भाई आहे, मला हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी देत व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. ही घटना तळवडे येथे घडली. सुधीर सोपान जाधव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संदीप ऊर्फ संजय आनंदा काळोखे (रा. देवी इंद्रायणी सोसायटी, तळवडे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय असून जाधव याने फिर्यादी यांना धमकी दिली. ''तू प्लॉटिंग व्यवसायात भरपूर पैसा कमावला आहे. माझ्यावर खून, बलात्काराची केस असून मी पिंपरी - चिंचवडचा भाई आहे. तुला व्यवसाय करायचा असेल तर दरमहा १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. पैसे दिले नाहीत तर जीवे मारीन'', अशी फिर्यादी यांना धमकी दिली. फिर्यादी यांच्याकडून ३८ हजार रुपये ऑनलाइन माध्यमातून घेतले. त्यानंतर पुन्हा ५० हजार रुपयांची मागणी करून जबरदस्तीने ४० हजार रुपये काढून घेतले. पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली. पोलिसात तक्रार दिल्यास फिर्यादी व त्यांच्या मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली.

ज्वेलर्समधून दागिने चोरणाऱ्याला पकडले
ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून आलेल्या तरुणाने सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानदारासह नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना चाकण येथील माणिक चौक घडली. सर्फराज ऊर्फ सोनू अन्सारी (वय १९, रा. बर्गे वस्ती, चाकण, मूळ - बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत दत्तात्रेय बागडे (रा. चाकण) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे माणिक चौक येथे रेणुका ज्वेलर्स हे दुकान आहे. फिर्यादी व त्यांच्या पत्नी दुकानात असताना आरोपी ग्राहक म्हणून दुकानात आला. त्याने कानातले खरेदी करण्याचा बहाणा करून फिर्यादी व त्यांच्या पत्नीची नजर चुकवून २५ हजार रुपये किमतीची सोन्याची रिंग चोरली. रिंग घेऊन पळून जात असताना हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आला. त्यांनी लोकांच्या मदतीने सर्फराजला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

कोयता बाळगणारा जेरबंद
बेकायदा कोयता बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कोयत्यासह अटक केली. ही कारवाई पिंपळे सौदागर येथील स्वराज चौकात करण्यात आली. अभिषेक भगवान मोहिते (वय २१, रा. पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्वराज चौकात एकजण शस्त्र घेऊन आला असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अभिषेक याला ताब्यात घेतले.त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता आढळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT