पिंपरी-चिंचवड

दहावीची परीक्षेची अशी आहे कस्टडोयन

CD

पिंपरी, ता.२४ ः सध्या इयत्ता दहावीची परीक्षा सुरू आहे. या कामासाठी दररोज सकाळी आठ वाजता कस्टडी उघडणे, त्या दिवसाच्या पेपरच्या पेट्या तपासणे, २७ केंद्रांवर सकाळी दहापर्यंत प्रश्‍नपत्रिका पोच करणे, परीक्षा केंद्राला भेटी देणे, पेपर सिलबंद स्वरूपात असल्याचे व्हिडिओ शूटिंग करणे, व्हिडिओ शूटिंगसह पेपर कस्टडीपासून परीक्षा केंद्रांवर पोचवणे...अशा अनेकविध कामांची चोख जबाबदारी कस्टोडियन अधिकारी पार पाडत असल्याचे दिसून येत आहे.

शहरात दोन मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू झाली. सलग २५ दिवसांच्या परीक्षेच्या कालावधीत कस्टोडियन अधिकाऱ्याकडे २० ते २७ परीक्षा केंद्र जोडली जातात. यात प्रामुख्याने परीक्षेचे व्हिडिओ शूटिंग दररोज एसएससी मंडळाकडे पाठवणे, पेपर सिलबंद स्वरूपात केंद्रावर वेळेत पोचल्याचा सर्व परीक्षा केंद्रांचा अहवाल गोळा करणे, केंद्रनिहाय विद्यार्थी उपस्थितीची माहिती संकलित करणे अशा कामांची जबाबदारी कस्टोडियनकडे सोपवली आहे. या कामांमुळे कस्टोडियनची दमछाक होत असल्याचे सांगण्यात आले. पेपर संपल्यानंतर प्रत्येक उत्तर पत्रिकेचा स्वतंत्र युआयडी स्टिकर चिटकवून पंचवीसचे गठ्ठे तयार करणे, तयार गठ्ठ्यांवर गुण पत्रके लावून ठेवणे. गठ्ठे बॅगमध्ये भरणे, बॅगवर पत्ते टाकणे पिनकोडसह बॅग सील करणे, जमा झालेले पेपर व युआयडी स्टिकर हिशोब करणे, सील बंद बॅग वर पोस्टाचे स्टिकर लावणे, तयार झालेल्या बॅग किंवा पार्सलचे वजन करणे नोंदी ठेवणे, दुसऱ्या दिवशी सर्व पार्सल टपाल कार्यालयात पोचवणे तसेच बोर्डात चार दिवसाने अहवाल जमा करणे, अशा विविध कामे कस्टोडियन पार पाडत असल्याचे चित्र आहे.

कोट
‘विद्यार्थी संख्येनुसार कस्टोडियन अधिकाऱ्यांच्या ताब्यात परीक्षा केंद्र असतात. त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडू नये, यासाठी सहाय्यक कस्टोडियन अधिकारी, रनर, क्षेत्रीय अधिकारी सोबतीला दिले जातात.’
-अनुराधा ओक, सचिव, राज्य मंडळ, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT