पिंपरी-चिंचवड

उगमस्थानापासूनच पवना, इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखा

CD

पिंपरी, ता. ३ : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जाणार आहेत. या दोन नद्यांमध्ये अनेक ठिकाणी सांड पाण्याचे नाले सोडले आहेत. यामुळे नदी दूषित होते. त्यासाठी प्रक्रिया करूनच पाणी नदीत सोडले पाहिजे. नदीच्या उगमस्थानापासून येणारे नाले अडवावेत, अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका, पीएमआरडीए प्रशासनाला केल्या आहेत.
शहरातील नदी प्रदूषणांबाबत नुकतेच ‘सकाळ’ने वृत्त दिले होते. नदी स्वछतेसाठी काम करणाऱ्या जलदिंडी प्रतिष्ठान व सिटिझन फोरमचे डॉ. विश्वास येवले, राजीव भावसार, सूर्यकांत मुथीयान, ओंकार गिरिधर, तुषार शिंदे, संदीप माळी, धनंजय भातकांडे, रवी उलंगवार यांच्यासह खासदार बारणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांच्यासोबत महापालिकेत बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, ‘‘पवना, इंद्रायणीमध्ये अनेक ठिकाणी नाले थेटपणे सोडले जातात. प्रक्रिया करूनच पाणी नदीत सोडले पाहिजे. त्यासाठी ज्या गावातून नदी वाहते, त्या प्रत्येक गावातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शाळा यांना सोबत घेऊन, नदी स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. नदी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. महापालिका, पीएमआरडीए हद्दीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करावी. तळेगाव दाभाडे, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड ज्या क्षेत्रातील पाणी नदीपात्रात जाते. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे. त्यांनाही त्यांच्या हद्दीतील पाण्यावर प्रक्रिया करण्याची सूचना करणार आहे.’’

‘एमआयडीसी’तील सांडपाणी थेट नदीत
‘एमआयडीसी’तील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. त्यावर प्रक्रिया केली पाहिजे. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेणार आहे. ‘एमआयडीसी’तील पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे त्यांना सांगितले जाईल. नदी स्वच्छतेचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला आहे. यापुढे दर महिन्याला बैठक घेऊन, नदी सुधारचा आढावा घेतला जाणार आहे. प्रत्यक्ष कारवाईचा आढावा घेणार आहेत. देशाला उदाहरण ठरेल अशी पवना, इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी झोकून देवून काम करणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
फोटो ः 47028

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT